गाळ्यात गाडी घुसून तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:53 IST2018-01-30T03:53:48+5:302018-01-30T03:53:57+5:30

गाडी शिकत असताना त्यावरील नियंत्रण सुटल्याने मार्केट यार्डमधील गाळ्यात घुसलेल्या एक वाहनाने मोटार व तीन दुचाकींना धडक दिली़ या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत़ ही घटना छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामधील गाळा क्र. ६६०मध्ये सोमवारी रात्री ९ वाजता घडली़

Three people were injured in a road accident | गाळ्यात गाडी घुसून तिघे जखमी

गाळ्यात गाडी घुसून तिघे जखमी

महर्षीनगर : गाडी शिकत असताना त्यावरील नियंत्रण सुटल्याने मार्केट यार्डमधील गाळ्यात घुसलेल्या एक वाहनाने मोटार व तीन दुचाकींना धडक दिली़ या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत़ ही घटना छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामधील गाळा क्र. ६६०मध्ये सोमवारी रात्री ९ वाजता घडली़
या घटनेत आसिफ बागवान, इम्तियाज बागवान, कप्तान ऊर्फ नसीर बागवान हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या घटनेची माहिती समजताच तेथे मोठी गर्दी झाली होती़ मोटारचालक आसिफ शेख (वय २७, रा़ कोंढवा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ आसिफ शेख हा मूळचा भिवंडी येथील राहणारा असून, सध्या कोंढव्यात राहतो़ तो त्याच्या सासºयाकडे आला होता़ तो मार्केट यार्डामध्ये फोर्ट आॅयकॉन ही मोटार शिकत होता़ अचानक त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची मोटार तेथे असलेली मोटार व तीन दुचाकी यांना धडक देऊन थेट गाळा क्र. ६६०मध्ये घुसली़ त्यात गाळ्यावरील तीन जण गंभीर जखमी झाले़ येथील कामगारांना जेवणाचे डबे पुरविणारे डबेवाले बडदे यांची दुचाकीही तेथेच उभी होती़ तिचे मोठे नुकसान झाले़ ही घटना घडताच तेथे मोठी गर्दी जमली़ मार्केट यार्ड पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ लोकांनी मोटारचालक शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़ या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रवीण चोरबेले हे वाहतूक पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे मार्केट यार्डाचे गेट उघडे असल्यामुळे इतर वाहने आत येऊन अपघात होत आहेत, असे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सांगितले. वाहन चााक आसिफ शेख याला मार्केट यार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे करीत आहे.

Web Title: Three people were injured in a road accident