पौड : मुळशी तालुक्यामध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. मुळशी धरणामध्ये एक तरुण बुडाला असून बोतरवाडी येथील शेततळ्यामध्ये दोघेजण बुडाले.अभिषेक सरकार (वय २६, मुळ रा. आगरतळा, त्रिपुरा) हा तरुण धरणात बुडाला आहे. तर बोतरवाडी येथे गणेश वसंत गुजर (वय २९), मयुरेश किसन गुजर (वय १६) हे दोघे बुडाले. अभिषेक हा एमटेक च्या द्वितीय वर्षाला शिकत होता. तो बाणिक चॅटर्जी हिच्या मुलीचा १० वाढदिवस साजरा करण्यासाठी मुळशी धरणावर मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यासाठी आला होता. पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. तर बोतरवाडी येथे शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या गणेश व मयुरेश या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे शनिवार दुपारी शेततळ्यात ईलेक्ट्रिकल मोटरचे काम करत होते. काम करत असताना गणेश याचा पाय घसरून तो तोल जाऊन तळ्यात पडला. पाण्यात पडल्याने तो बुडू लागला. हे पाहुन मयुरेशने त्याला वाचवण्यासाठी तळ्यात जाऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुदैर्वाने दोघेही बुडाले. दोन्ही घटनास्थळांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकरांनी भेट दिली.
मुळशी तालुक्यात तीनजण बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 21:25 IST
मुळशी तालुक्यामध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.
मुळशी तालुक्यात तीनजण बुडाले
ठळक मुद्देमुळशी धरणात एक तर शेततळ्यात दोघे बुडाले