शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तिघांना अटक, अटक आरोपींची संख्या १३ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:50 AM2024-01-13T10:50:07+5:302024-01-13T10:50:41+5:30

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री या तिघांना अटक केली आहे...

Three more arrested in Sharad Mohol murder case, the number of arrested accused has increased to 13 | शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तिघांना अटक, अटक आरोपींची संख्या १३ वर

शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तिघांना अटक, अटक आरोपींची संख्या १३ वर

- किरण शिंदे

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. आदित्य गोळे (वय २४), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री या तिघांना अटक केली आहे. 

शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी हजर होता. याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची व्यवस्था ही नितीन खैरे याने केली होती. तर आदित्य गोळे यांनी बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. मोहोळचा खून करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात तो सहभागी होता. तर तिसरा आरोपी सुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. या संपूर्ण कटात तो सहभागी होता.

५ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतरदारा येथील राहत्या घराजवळ शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळचे साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचाही सहभाग आहे. गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Read in English

Web Title: Three more arrested in Sharad Mohol murder case, the number of arrested accused has increased to 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.