शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रेमविवाह केल्याने बहिणीच्या पतीचे भावांनीच केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 10:23 IST

बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या पतीचे पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या दोन भावांसह तिघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या पतीचे पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या दोन भावांसह तिघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटात शोभावा असा पुणे ते  माण तालुक्यामधील कुक्कडगावाच्या घाटात पोलिसांनी पाठलाग करुन विजय श्रीकांत दबडे (28) यांची सुटका केली. नंदू सुखदेव करांडे, नवनाथ काळेल, रणजित करांडे अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा विजय दबडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शोभा या कामानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांची जीममध्ये काम करणाऱ्या विजय दबडे बरोबर ओळख झाली. दोघांनी प्रेमविवाह केला त्याला विजयच्या कुटुंबाची मान्यता होती. परंतु, शोभाच्या घरच्यांचा या विवाहाला विरोध होता. शोभा यांनी 15 जुलै 2018 रोजी विवाह केल्यानंतर शोभाच्या नातेवाईकांनी शोभा व विजयला फोन करुन धमकाविले होते.

बुधवारी सकाळी विजय नेहमीप्रमाणे कामावर जात असताना सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ शोभाचा मावस भाऊ नवनाथ काळेल व सख्खा भाऊ नंदू करांडे यांनी त्याला  पिस्तुलाचा धाक दाखवला. तसेच जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. विजय जीममध्ये आला नसल्याचे जीममधील एकाने शोभाला याबाबत कल्पना दिली. याप्रकरणी अधिक चौकसी केली असता विजयची गाडी रस्त्यावर आढळून आली तसेच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी पिस्तूलाचा धाक दाखवून विजयला काही जणांनी कारमध्ये घालून नेल्याचे सांगितले.

विजयचे अपहरण झाल्याचे समजताच सिंहगड रोड पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, स्मिता यादव, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी साळुंके, ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सुधिर घाडगे, विनोद महागडे, किरण देशमुख, संतोष सावंत, राहुल शेडगे, प्रशांत काकडे, विजय पोळ, संग्राम शिनगारे , निलेश जमदाडे, रफिक नदाफ या पथकाने याबाबत अधिक माहिती काढली. 

पुणे, सोलापूर, सातारा ग्रामीण पोलिसांना फोन करुन वेळोवेळी मदत घेण्यात आली. मोबाईल तंत्रज्ञ राहुल शेडगे यांनी वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे आरोपीच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन काढून पोलिसांना दिले  तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे मालोजी देशमुख व त्यांच्या पथकाने सहकार्य केले. पोलिसांनी पाठलाग करून अखेर सातारा जिल्ह्यातील माण कुक्कडगाव घाटात विजयची सुखरूप सुटका करून तिघांना ताब्यात घेतले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे