पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, आई, वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 12:16 IST2021-02-08T10:12:53+5:302021-02-09T12:16:26+5:30
Accident News : अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, आई, वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू
भिगवण : पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.एकाच घरातील आई वडील आणि मुलगा यांनी या अपघातात जीव गमावला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गीता अरुण माने वय ३६ मुकंद अरुण माने वय १५ अरूण बाबुराव माने वय ४५ असे अपघातातील मृतांची नावे आहेत.तर साक्षी अरुण माने वय १८ ड्रायव्हर महादेव रकमाजी नेटके वय ५६ अशी जखमीची नावे आहेत.ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ग्रस्त गाडी ने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.वेगात असणाऱ्या या गाडीच्या ड्रायव्हर ला ऊस वाहतूक करणारे वाहन न दिसल्यामुळे अपघात झाला.तर या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला कोणताही टिपले टर नसल्यामुळे अपघात घडल्याचे स्थानिक सांगत आहेत.