शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तिघे ठार

By admin | Updated: October 7, 2015 04:03 IST

केडगाव ता. (दौंड) येथे चौफुला रस्त्यावर अशोक लेलँड व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीघेजण ठार झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने सदरचा ट्रक

केडगाव : केडगाव ता. (दौंड) येथे चौफुला रस्त्यावर अशोक लेलँड व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीघेजण ठार झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने सदरचा ट्रक पेटवून दिला. ही घटना आज मंगळवारी (दिनांक ६) रात्री साडे आठच्या दरम्यान घडली.या घटनेत बोरीपार्धी येथील संतोष विष्णू नेवसे (वय ३४), सुभाष अर्जुन नेवसे (वय ४२), हे जागीच ठार झाले. तर श्रीरंग मारुती नेवसे (वय ४४) हे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तिघेही युवक विवाहीत होते. हे तिघेजण केडगाववरून चौफुल्याकडे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने ट्रकने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, तिघेजण रस्त्यावरून दूर फेकले गेले. दुचाकीचीही दुरवस्था झाली होती. मयतांच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागला होता. घटनेनंतर परिसरातील जमाव तेथे जमा झाला. त्यांनी ट्रक रॉकेलच्या साह्याने पेटवून दिला. सुमारे पाऊण तासानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. केडगाव चौफुला रस्त्यावर असणाऱ्या अरुंद पुलाशेजारी ही घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या दोन वषार्तील या पुलाजवळील ही तिसरी घटना आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. तिघांना शवविच्छेदनासाठी यवत येथे नेले होते. केडगाव चौफुला रस्त्यावर अरुंद पुलावर यापूर्वी अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे शिरुर- सातारा या राज्यमार्गावर हा रस्ता असुनही ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य आहे. यामुळेच सदरचा अपघात घडला असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला.