सोमेश्वरनगर : सोरटेवाडी ता.बारामती गावच्या हद्दीत रोहित गाडेकर वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी या तरुणाचा धारदार शास्त्राने खून प्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना चाकण येथून तर एका आरोपीला कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे. खून झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात आरोपींना जेरबंद करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना चाकण पोलिसांनी यापूर्वीच अटक करत त्यांना वडगाव निंबाळकर पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. रविवारी दि. ६ रोजी सोरटेवाडी गावच्या हद्दीत कुलकर्णी चारी ते शेंडकरवाडी रस्त्यावर गोरख खेंद्रे यांच्या पोल्ट्री फार्मजवळ रोहित याचा मृतदेह अंगावर वार झालेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. खुनानंतर तीनही आरोपी फरार झाले होते. त्यातील सागर माने रा. सोरटेवाडी, ता. बारामती व विक्रम काकासो मासाळ रा. मासाळवस्ती, ता. बारामती यांना चाकण पोलिसांनी बहुळ ता. खेड, जि. पुणे येथून अटक केली होती. तर अमोल वसंत माने हा तिसरा आरोपी फरार होता. त्याला कर्नाटकातील निडगुंडी येथून गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेत अटक करण्यात आली.
सोरटेवाडी खून प्रकरणी तिघे जेरबंद; दोघांना चाकण तर एकाला कर्नाटक मधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:13 IST