पुणे नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीचा फोन; पोलिसांची तत्काळ तपासाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 11:37 IST2023-08-22T11:36:41+5:302023-08-22T11:37:41+5:30

याबाबतची माहिती पुणे नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.

threatening call from america to pune control room police immediately started an investigation | पुणे नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीचा फोन; पोलिसांची तत्काळ तपासाला सुरुवात

पुणे नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीचा फोन; पोलिसांची तत्काळ तपासाला सुरुवात

पुणे: पुण्यातील नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीवजा फोन आल्याची माहिती देण्यात आली आहे. फोनवरील व्यक्तीने मुंबईत राहणारा एक व्यक्ती अतिरेकी असल्याचे सांगून फोन कट केला. याबाबतची माहिती पुणे नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली असता, मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने संबधित फोन करणार्या व्यक्तीचे लोकेशन तपासले असता ते अमेरिकेचे निघाले. त्या व्यक्तीला पोलिसांनी नियंत्रण कक्षातून फोन केला असता. त्याने अधिक माहिती दिली नाही. मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिस तपास करत आहेत. मात्र हा एक खोडसाळ पणा केल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

Web Title: threatening call from america to pune control room police immediately started an investigation

टॅग्स :Policeपोलिस