शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

Swargate Bus Depot: बसस्थानकात हजारो महिला करतात प्रवास; त्यांच्या सुरक्षेला न्याय मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:12 IST

खुर्च्या मोडलेल्या असल्याने महिला, पुरुषांना फरशीवर बसावे लागत आहे, तसेच उकाडा वाढल्याने नागरिकांना सावलीखाली बसण्याची वेळ आजही दिसून येत आहे

पुणे : स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी बलात्काराची घटना घडल्यावर पोलिस, एसटी प्रशासनाकडून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. परंतु, अस्वच्छ बसस्थानक, प्रचंड धूळ, बसायला खुर्च्या नसणे, हायमास्ट दिव्यांची कमतरता, प्रवाशांना प्यायला पाणी नसणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट बसस्थानक चोवीस तास गजबजलेला असतो. अशा गर्दी आणि गजबजलेल्या स्वारगेट स्थानकात मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे पुणे शहर हादरले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून स्वारगेट बसस्थानकात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शिवाय गुन्हेगाराला न्याय मिळावा, या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यामुळे बसस्थानकात राजकीय आखाडा भरल्याचे चित्र होते.

प्रवाशांना झाडांचा आधार

मुख्य बसस्थानक, तसेच सोलापूर, मुबंई, कोल्हापूर, भिवंडी याकडे जाणाऱ्या इतर बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या नाहीत. जे आहेत त्यातील बरेच खुर्च्या मोडलेल्या आहेत. त्यामुळे महिला, पुरुष नागरिकांना फरशीवर बसावे लागत आहे. तसेच उकाडा वाढल्यामुळे काही नागरिकांना सावलीखाली बसण्याची वेळ प्रवाशांना आजही आहे. एसटीला महिला प्रवाशांची संख्या वाढत असताना त्यांच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी एसटी प्रशासन कुचकामी ठरत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड आकाशाकडे

आगारप्रमुखांच्या केबीनसमोर तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सीसीटीव्ही कॅमेरा हा आकाशाकडे तोंड करून लावण्यात आला आहे. प्रवासानिमित्ताने रोज हजारो नागरिक डेपोमध्ये ये-जा करतात. परंतु, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. डेपोतील मध्यवर्ती भागात पार्किंग केलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला. विशेष म्हणजे या बसच्या समोरच असलेला सीसीटीव्ही कॅमेरा हा लोखंडी खांबावरून खालच्या बाजूला आणि आकाशाकडे वळवलेला होता. या प्रकारामुळे महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट एसटी बस डेपोतील सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे निदर्शनास आले आहेत.

एजंटाची बिनधास्त घुसखोरी

बलात्काराची घटना घडल्यामुळे पोलिस, एसटी प्रशासन फौजफाटा उभा आहे. तरीही खासगी वाहतूकदार लोकांच्या एजंट बसस्थानकात बिनधास्त फिरत आहेत. एजंटांनी खुद्द पत्रकारांना येऊन साताराला येता का, अशी विचारणा केली. पोलिस असताना एजंटांची घुसखोरी होते, तर इतर काय परिस्थती असेल असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे दिसते.

महिलांसाठी हेल्पडेस्क, सुरक्षारक्षक गरजेचे

स्वारगेट बसस्थानकात दूरच्या भागांतून येणाऱ्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी महिला सुरक्षारक्षक आणि हेल्प डेस्क असणे अत्यावश्यक आहे. महिलांना काही समस्या आल्यास तेवढ्यासाठी स्वतंत्र हेल्पडेस्क उपलब्ध नसेल, तर तक्रार कुठे करायची ? हा प्रश्न प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे, प्रशासनाने त्वरित महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी आणि महिला हेल्प डेस्क सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

महिला स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी

महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिला स्वच्छतागृहात शुल्क घेण्यासाठी पुरुष कर्मचारी नेमले आहे. महिला स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी का ? महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक का नाही ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छतागृहात महिला कर्मचारी असणे गरजेचे आहे. यामुळे महिलांना सुरक्षित आणि सुसंवादात्मक सेवा मिळू शकते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

महिलांना बसण्याची नाही सोय

स्वारगेट बसस्थानकावर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बसण्याची सुविधा उपलब्ध नाही. मोठ्या प्रमाणावर महिला प्रवासी येथे येत असतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित आसनव्यवस्था नसल्यामुळे त्यांना झाडाखाली किंवा जिथे जागा मिळेल तिथे बसावे लागते. ही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण आहे. प्रवाशांची मोठी वर्दळ असूनही, महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षागृह किंवा बसण्याची सुविधा नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर महिला प्रवाशांसाठी हे मोठे संकट ठरू शकते. त्यामुळे ताबडतोब आवश्यक उपाययोजना करून महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

या उपाययोजना आवश्यक

सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत आणि त्यांची नियमित तपासणी व्हावी. महिला सुरक्षारक्षक आणि हेल्प डेस्क सुरू करावे. महिला शौचालयात पुरुष कर्मचारीऐवजी महिला कर्मचारी नियुक्त करावी. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करावी.

कॅमेरा दुरुस्तीला वेग

स्वारगेट बसस्थानकावर बलात्काराची घटना घटल्यावर एसटी प्रशासनाला जाग आली आहे. बंद आणि निकामी झालेल्या सीसीटीव्ही दुरुस्ती करण्यात येत आहे. विशेषतः महिला शौचालयाच्या परिसरातील बंद पडलेले कॅमेरे दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, स्थानकावरील ३६ सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्यक्षात कार्यरत आहेत का, की ते केवळ नावालाच आहेत ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेswargateस्वारगेटswargate bus depotस्वारगेट बसस्थानकpassengerप्रवासीWomenमहिलाPoliceपोलिस