शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

पुणे-मुंबई या महानगरांना जोडणारी 'लाईफलाईन' बंद; हजारो चाकरमान्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 7:22 PM

पुणे- मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी

पिंपरी : पुणेमुंबई या दोन महानगरांना जोडणारी रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने हजारो हात बेरोजगार झाले आहेत. या दोन्ही शहर व परिसरातील हजारो कामगार, कर्मचारी, अधिकारी लॉकडाऊनपूर्वी दररोज कामाच्या ठिकाणी रेल्वेने ये-जा करीत होते. त्यांच्यासाठी लाईफलाईन असलेली ही रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झाली नसल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.  

पुणेमुंबई दरम्यान रेल्वेकडून डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्सप्रेस अशा काही गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांना मासिक पास उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच या गाड्या सुपरफास्ट असल्याने पिंपरी, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, वडगाव मावळ, कर्जत, पनवेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे आदी स्थानकांवर या गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना या गाड्यांनी प्रवास करणे शक्य होत नाही. त्यासाठी सिंहगड व सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. पुणे ते मुंबई दैनंदिन प्रवास करणा?्या प्रवाशांसाठी मासिक पास उपलब्ध करून देण्यात यावेत, मुंबईच्या धर्तीवर पुणे ते लोणावळा लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी आस्थापानांमधील कामगार आदी पुण्याहून मुंबईत दररोज ये-जा करतात. त्यांच्यासाठी रेल्वे हे अतिमहत्वाचे, वेगवान व आर्थिकदृष्टीने परवडणारे प्रवासाचे साधन आहे. कर्तव्यावर उपस्थित न राहिल्यास त्यांचे वेतन कपात केले जाते, तसेच सतत गैरहजर राहिल्यास कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. हे कर्मचारी व कामगार मध्यमवर्गीय असल्यामुळे रेल्वेचे दररोज आरक्षण करणे त्यांना परवडणारे नाही तसेच ते त्रासदायकही आहे. त्यासाठी महिन्याला पाच ते सहा हजार रुपए खर्च होतात. तसेच लोणावळ्यापर्यंत खासगी वाहन किंवा दुचाकीने ये-जा करावी लागते.

चाकरमाने, व्यावसायिक व विद्यार्थ्यांची गैरसोयरेल्वेसेवा बंद असल्याने चाकरमाने, भाजीविक्रिते दूग्ध व्यावसायिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यासाठी पुणे-लोणावळा लोकल व पुणे - मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व पुणे रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे (डीआरयूसीसी) सदस्य ईक्बाल मुलाणी यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlocalलोकलrailwayरेल्वेPuneपुणेMumbaiमुंबई