‘सीव्हीजिल’ने ओलांडला एक हजार तक्रारींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 12:07 IST2019-04-15T12:02:51+5:302019-04-15T12:07:46+5:30

पुणे, बारामती, मावळ व शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघांतून रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १,००४ तक्रारी सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे तक्रारी केल्या आहेत.

Thousands of complaints have been exceeded by C-Vigil | ‘सीव्हीजिल’ने ओलांडला एक हजार तक्रारींचा टप्पा

‘सीव्हीजिल’ने ओलांडला एक हजार तक्रारींचा टप्पा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : ८४७ निकाली, तर १५७ तक्रारी केल्या रद्दसी-व्हिजिल वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित अ‍ॅपवर माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक गुप्त संबंधित पथकाची १५ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचून तक्रारीवर पुढील ३० मिनिटात कारवाई

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांना सुध्दा आचारसंहिता भंगाच्या घटनांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे देता यावी. या उद्देशाने निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सी-व्हीजिल अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या एक हजारापेक्षा जास्त तक्रारी केल्या आहेत. त्यातील ८४७ तक्रारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाली काढल्या असून १५७ तक्रारी अयोग्य असल्याने रद्द केल्या आहेत.
पुणे, बारामती, मावळ व शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघांतून रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १,००४ तक्रारी सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे  तक्रारी केल्या आहेत. मार्च महिन्याच्या १० तारखेपासून आचारसंहिता सुरू झाल्यापासून नागरिकांकडून तक्रारी येण्यास सुरूवात झाली. तक्रार प्राप्त झाल्यासून १०० मिनिटांत तक्रार निकाली काढण्याचे बंधन आहे. त्यामुळे राजकीय पक्षांबरोबरच सर्व सामान्य नागरिकांकडूनही या अ‍ॅपवर तक्रारी केल्या जात आहेत. 
लोकसभा निवडणूक अधिक पारदर्शक व शांततेतामय वातावरणात व्हावी यासाठी नागरिकांनी सी-व्हिजिल अ‍ॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक आयोगातर्फे केले होते. जिल्ह्यातील मतदारांनी अ‍ॅपचा अधिकाधिक वापर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर सी-व्हिजिल वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला आहे. 
निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होत असल्यास नागरिकांना दोन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड व छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा आहे. अ‍ॅपवर माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक गुप्त ठेवला जातो. नागरिकांनी केलेली तक्रार नोंदविल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ही तक्रार जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होते. कक्षाकडून तक्रारीची माहिती भरारी पथकाकडे पाठवविली जाते. त्यानंतर संबंधित पथक १५ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचून तक्रारीवर पुढील ३० मिनिटात कारवाई केली जाते. सर्वाधिक तक्रारी अनधिकृत प्रचारफलक, बोर्ड, फ्लेक्स, होर्डिंग यांच्या आहेत. तसेच वृत्तवाहिन्यावर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या भाषणाचे व्हिडिओ सुद्धा तक्रार म्हणून प्राप्त होत आहेत.  

Web Title: Thousands of complaints have been exceeded by C-Vigil