पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचा विचार! सर्व व्यवहार रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 12:21 IST2021-07-30T12:21:06+5:302021-07-30T12:21:14+5:30
अजित पवार यांचे संकेत

पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचा विचार! सर्व व्यवहार रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
ठळक मुद्देनियमांचे पालन करावेच लागेल
पुणे : ज्या ठिकाणी पॉझेटिव्हिटी एखादा टक्का असेल तिथे निर्बंध कमी करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दर्शवला आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे मेट्रोच्या कार्यक्रमासाठी आले असताना पवार यांनी सरकारही कोरोनाचे निर्बंध शिथील करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली. जिथे ४ वाजेपर्यंत वेळ दिली आहे तिथे ती ८ वाजता करण्यात येईल असे ते म्हणाले.
लोक सोमवार ते शुक्रवार काम करतात, त्यामुळे शनिवार रविवार मोकळीक हवी आहे. त्याचाही विचार सुरू आहे. मात्र निर्बंध शिथिल झाले तरीही मास्क, सँनिटायझर,गर्दी नाही हे नियम पाळावेच लागतील असे पवार यांनी सांगितले.