'त्या' ३ बांगलादेशी मजुरांनी नारायणगावमधून काढले आधारकार्ड, चक्क मतदार यादीत आढळलं एकाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 22:07 IST2025-02-09T22:06:26+5:302025-02-09T22:07:29+5:30

नाशिक पोलीस पथकाने नारायणगाव येथे तपास केला असता ३ पैकी १ बांगलादेशी नागरिकाचे नाव नारायणगाव ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

'Those' 3 Bangladeshi laborers make Aadhaar cards from Narayangaon, one's name was found in the voter list | 'त्या' ३ बांगलादेशी मजुरांनी नारायणगावमधून काढले आधारकार्ड, चक्क मतदार यादीत आढळलं एकाचं नाव

'त्या' ३ बांगलादेशी मजुरांनी नारायणगावमधून काढले आधारकार्ड, चक्क मतदार यादीत आढळलं एकाचं नाव

नारायणगाव : नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी नागरिकांना नाशिक येथील गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली. यात तिघांकडे आधार कार्ड व रहिवाशी दाखला नारायणगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.  तथापि, नाशिक पोलीस पथकाने नारायणगाव येथे तपास केला असता ३ पैकी १ बांगलादेशी नागरिकाचे नाव नारायणगाव ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. हे नागरिक मजुरीचे काम करून अवैधरित्या भारतात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या आठ पैकी अलीम सुआन खान मंडल (वय ३२), अलअमीन अमिनूर  शेख ( वय २१) व मोसिन मौफिजुल मुल्ला (वय २२) यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रहिवाशी दाखला, आधारकार्ड मिळून आले आहे. या पत्त्याच्या आधारे या बांगलादेशींनी आधार कार्ड काढल्याचे उघड झाले आणि त्यातील एका बांगलादेशीने मतदान कार्ड काढून मतदार यादीत आपले नाव घातले असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

आधारकार्ड साठी जो दाखला देण्यात आला तो नारायणगाव ग्रामपंचायत मधून देण्यात आला होता मात्र तो कोणी दिला कि तो बनावट होता याचा तपास नाशिक पोलीस चौकशी करीत आहेत. या चौकशीत बांगलादेशी नागरिक अलामीन अमीनूर शेख यांचे नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ मधील मतदार यादीत नाव आढळून आले आहे. त्यांचे मतदान कार्ड (AFB ८९०७६६९) क्रमांकाचे असल्याचे आढळून आले आहे. 

शनिवारी ( दि ०८ ) नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम व ३ पोलीस अंमलदार  यांचे पथक यांनी अलीम सुआन खान मंडल व अलअमीन अमिनूर शेख याना घेऊन नारायणगाव येथे तपास कारण्यासाठी आले होते. बांगलादेशी नागरिक नारायणगाव येथे कोठे राहत होते याची माहिती घेऊन खोली मालक यांना चौकशीची नोटीस बजावली तसेच त्यांनी ज्या सुविधा केंद्रात आधारकार्ड काढले त्याची तपासणी केली व त्यानाही नोटीस बजावली. तपास पथकाच्या ताब्यात असलेले ते दोघे हि बांगलादेशी नागरिक नारायणगाव येथील वॉर्ड क्र. ४ मधील बीएसएनल कार्यालयासमोरील एका बिल्डिंग मध्ये राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  त्यांनी २०२२ मध्ये आणि २०१५ मध्ये आधारकार्ड

पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांना रहिवासी दाखले कोणी व कधी दिले याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये स्वयंघोषणापत्र व आधार कार्ड नंबर घेतल्या शिवाय रहिवासी दाखले दिले जात नाही. त्यामुळे या घटनेत कोणी कर्मचारी अथवा अन्य कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे यांनी दिली

बांगलादेशी नागरिकाचे नारायणगाव मतदार यादीत नाव कसे आले, त्यांना दाखला कोणी दिला व कोणी मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट केले आहे याची चौकशी करण्याची मागणी नारायणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गट अध्यक्ष गणेश वाजगे व माजी ग्रामपंचात सदस्य रामदास अभंग  यांनी जुन्नर तहसील कार्यालय यांचे कडे केली आहे. 

नारायणगाव येथील ग्रामपंचायत मतदार यादीत असलेले बांगलादेशी नागरिक अलामीन अमीनूर शेख यांचे प्रभाग क्रमांक ५ मधील मतदार यादीत नाव

Web Title: 'Those' 3 Bangladeshi laborers make Aadhaar cards from Narayangaon, one's name was found in the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.