शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pune: 'मला या महिलेनं मारून टाकण्याचा प्रयत्न केला', पतीचा व्हिडिओ व्हायरल, कात्रीने गळा कापून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:45 IST

मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत, म्हणून मला तिला मारावं लागलं

पुणे: घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यांनतर पतीने व्हिडिओ शूट केल्याची माहिती समोर आली आहे. ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. लेन नं. ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे त्या  महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी चंदननगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मूळ बीडचा रहिवासी आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. तुळजाभवानी नगर येथे तो भाड्याने राहत आहे. गीते नवरा-बायकोत घरगुती कारणावरून भांडणे होत होती. बुधवारी पहाटे देखील याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात आरोपी शिवदास याने घरातील कात्रीने ज्योती हिच्या गळ्यावर वार करुन खून केला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपी शिवदास गीते याला ताब्यात घेत अटक केली. तसेच ज्योती हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये ज्योती (27) ने शिवदास गिते (37) याच्याशी लग्न केले होते. ज्योती शिलाई मशीनद्वारे कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामं करत होती. तर दुसऱ्या बाजूला शिवदास गिते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे स्टेनो म्हणून कार्यरत आहे. या दाम्पत्याला 5 वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा होता. शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा तिच्या चारित्रावर संशय घेत होता आणि यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होते. अखेर त्याने बुधवारी पहाटे झालेल्या भांडणातून पत्नीचा खून केला. 

व्हिडिओ मधून काय म्हणाला शिवदास 

मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला माराव किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माराव लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत.

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू