शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयाने अनाथ अल्पवयीन मुलीला ढकलले वेश्या व्यवसायात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

पुणे : आईवडिलांच्या मृत्यूनंतर ती अल्पवयीन मुलगी अनाथ बनली. तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तृतीयपंथीयाने तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले. ...

पुणे : आईवडिलांच्या मृत्यूनंतर ती अल्पवयीन मुलगी अनाथ बनली. तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तृतीयपंथीयाने तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले. यात झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

विमानतळ पोलिसांनी पोस्को अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माया महादेव ऊर्फ आरती काळे, तृतीयपंथी महादेव ऊर्फ भारती काळे (दोघे रा. कलवड जकात नाक्याजवळ, धानोरी) आणि अन्य ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी १७ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी मुलीच्या आईवडिलांचा मृत्यू झाला असून ती लोहगावातील एका महिलेकडे राहण्यास आली. तिची माया व महादेव काळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी या अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यास सुरुवात केली. ओळखीच्या ग्राहकांकडून पैसे घेऊन तिला वेश्यागमनासाठी खराडी येथील सूर्या लॉज येथे पाठवले जात असे. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिने ९ जानेवारीला ससून रुगणालयात एका मुलाला जन्म दिला. पोलिसांनी महिला दक्षता समितीच्या महिला सदस्यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.