शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट न घेताच तिस-या लग्नाकरिता बांधल्या मुंडावळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 12:35 IST

घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा आहे.

ठळक मुद्देपत्नीची मुलाचा ताबा व पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दुस-या पत्नीला केली बेदम मारहाण

पुणे : पहिल्या पत्नीशी रीतसर घटस्फोट न घेताच पतीने दुसरे लग्न केले. तिला मारहाण करुन जबरदस्तीने माहेरी पाठवून देत त्याने तिस-या लग्न करण्याची सुरुवात केली. यासगळ्यात निराधार झालेल्या दुस-या पत्नीने मुलाचा ताबा व पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरुणा आणि रमेश यांना अभिषेक नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. तो सध्या रमेशच्या ताब्यात आहे. मात्र रमेशने त्याचा ताबा अरुणा यांना देण्यास नकार दिला आहे. घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असतानाही त्याने दोन महिलांबरोबर लग्न केले. तसेच त्याच्या तिस-या पत्नीने व त्याने दोन नंबरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. एवढेच काय तिला पोटच्या मुलाला देखील भेटू दिले नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे तिने दाखल केलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, अरुणा यांचे डिसेंबर 2011 साली रमेश बरोबर लग्न झाले. मात्र रमेशने त्याचे यापूर्वीच लग्न झाले असून त्याला तीन मुली असल्याची माहिती अरुणा यांच्यापासून लपवून ठेवली. पुन्हा लग्न न होण्याच्या भीतीने व रमेशने दोघींना नांदविण्याचे वचन दिल्याने अरुणा यांनी याबाबत तक्रार केली नव्हती. लग्नानंतर काही महिन्यांतच रमेशने विविध कारणांवरून अरुणा यांना मारण्यास सुरवात केली. तब्येत बिघडल्याने रमेशने अरुणा यांना एप्रिलमध्ये जबरदस्ती माहेरी पाठवले. त्यानंतर काही दिवसांतच पतीने अनुराधा (सर्व नावे बदललेली) नावाच्या महिलेबरोबर लग्न केल्याचे समजले. याबाबत जाब विचारण्यासाठी फोन केला असता रमेशने अरुणा यांना फोनवरून शिवीगाळ केली. तर अनुराधा हिने जीवे मारण्याची धमकी दिली. सासरी केल्यानंतर रमेशने मारहाण केल्याची तक्रार अरुणा यांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद आहे. अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. करिष्मा पाटील आणि अ‍ॅड. रेश्मा सोनार यांच्यामार्फत दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नHinduहिंदूCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयDivorceघटस्फोट