शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा नवा फंडा! पैसे बाहेर येतात त्याठिकाणी पट्टी, एटीएममध्ये छेडछाड करणाऱ्या दोघांना अटक

By भाग्यश्री गिलडा | Updated: August 4, 2023 12:43 IST

पैसे अडकून राहिले असतील, नंतर ते रिफंड होतील असे कस्टमरला वाटते

पुणे : धनकवडी भागातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. ०२) धर्मेंद्र श्रीशिवलाल (वय ३०) आणि सोनूकुमार जगदेव सरोज (दोघेही रा. उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.  रामचंद्र मल्लकार्जुन जाधव (वय ३८, रा. बिबवेवाडी) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे जाधव हे पैसे काढण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. सगळा तपशील टाकून झाल्यावर एटीएममधून ६ हजार रुपये नकद कलेक्ट करा असा मेसेज दर्शवल्यावर जाधव यांनी काही वेळ वाट पहिली मात्र कॅश आली नाही. बहुतेक एटीएममध्ये पैसे संपले असावेत आणि बँकेत पुन्हा जमा झाले असावेत असा विचार करून जाधव माघारी परतले. मात्र बँकेत पैसे जमा झालेच माही आणि जाधव यांनाही मिळाले नाही तेव्हा सीसीटीव्ही तपासून पहिले असता शटर टेम्परिंग करून फसवणूक केल्याचे लक्षात आले. बँकेची आणि खातेधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवार (दि. ०५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.    

शटर टेम्परिंग करून केली फसवणूक 

दोघा आरोपींनी एटीएममधून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी पट्टी टाकली होती. पैसे आले कि ते तिथेच अडकून राहतात आणि ग्राहकाला भेटत नाही. पैसे आले नाही म्हणजे रिफंड होतील असे कस्टमरला वाटते. आणि कस्टमर तेथून निघून गेल्यावर हे दोघे ती पट्टी काढून पैसे काढून घेतात.   - धीरज गुप्ता, पोलीस उपनिरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे

टॅग्स :PuneपुणेatmएटीएमMONEYपैसाThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी