शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची पळापळ; चार घरफोडे अटकेत

By admin | Updated: June 13, 2015 22:39 IST

सासवडमध्ये चोरी व घरफोडीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

वाघापूर : सासवडमध्ये चोरी व घरफोडीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सासवड परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ केल्यानंतर अवघ्या एका दिवसात चार चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वीच मोबाईल शॉपी फोडल्याचे तपासात कबूल केले आहे. दरम्यान, या चौघांच्या पोलिस कोठडीदरम्यान अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. तब्बल २२ मोबाईल संच आणि रिचार्ज कार्डसह पान टपरीतील साहित्य असा सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : विशाल ऊर्फ सागर ऊर्फ घाऱ्या विजय सातपुते (वय २२, रा. साडेसतरा नळी, तुपेवाडा सर्व्हे नं. २०३ हडपसर, मुळ रा. घुडेगाव, ता. पाटण, जि. सातारा), महेश सुभाष थोरात (वय २७, रा. कराड आगाशिवनगर शिवदर्शन कॉलनी, ता. कराड जि. सातारा), सोनू मुरलीधर दुधाळ (वय २२ रा. वैद्यवाडी, कोलेटी बेकरीसमोर, मुळा पाटबंधारे कॉलनी, हडपसर) आणि चेतन दयानंद कुंदन (वय १९, रा. सय्यदनगर, ससाणेवस्ती, हडपसर, पुणे). दरम्यान या चौघांना प्रथम दोन दिवसांची, त्यानंतर पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजे पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.