महाळुंगे एमआयडीसवरही चोरांची नजर, लंपास केली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 16:14 IST2021-03-29T16:14:01+5:302021-03-29T16:14:45+5:30
सापळा रचून केले दोघांना अटक

महाळुंगे एमआयडीसवरही चोरांची नजर, लंपास केली दुचाकी
पिंपरी: एमायडीसीतून दुचाकी चोरी करणाऱ्या वाहन चोरट्यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. महाळुंगे पोलिसांनी ही कारवाई केली.
बलविंदर हरभजन सिंग (वय ३८), कमीरसिंग शिंदरसिंग चौहाण (वय २४, रा. जाधव नगर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इरून ताजुद्दीन सय्यद (वय ३८, रा. वाकड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची दुचाकी मौजे कुरळी गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या कुशल गॅरेज समोर २२ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार्क केली होती. आरोपींनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २४ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर फिर्यादीने चाकण पोलिसांकडे दुचाकी चोरीची तक्रार केली.
चोरीच्या वाहनांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. त्यावेळी आरोपी कुरुळी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीची दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. पोलीस निरीक्षक अरविंद पवार, निरीक्षक गुन्हे शाखा आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.