शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात चोरट्याने पोलिसालाच गंडवलं , 80 हजाराची हातचलाखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 07:31 IST

लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचा-याला चोरट्यानेच घातला 80 हजाराचा गंडा

पुणे : लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचा-याला पैसे काढताना मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने त्यांच्याकडील एटीएम कार्ड बदली करून परस्पर ८० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.मोहमद अझरुद्दीन महागामी (वय२३, रा़ सोलापूर) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी पोलीस नाईक अशोक किसन सातव यांनी फिर्याद दिली होती़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, अशोक सातव हे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना पैसे न निघाल्याने एकाने त्यांना मदत करण्याचा बहाणा करून पिन क्रमांक विचारला व त्यांना पैसे काढून देत असल्याचा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांना दुसरे कार्ड दिले. काही वेळाने दुस-या एटीएमवरून त्याने ८० हजार रुपये काढून घेतले. सातव यांना मोबाईलवर तसा संदेश आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली़या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील एटीएम सेंटरमधील फुटेजवरून आरोपीचा फोटो मिळविला. त्याचा शोध सुरू केला, त्या वेळी आरोपी ढोले पाटील रोडवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहमद महागामी याला पकडले. त्याच्याकडून सातव यांचे ८० हजार रुपये हस्तगत केले, त्याने अशाप्रकारे आणखी दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, एकूण ३ गुन्ह्यांमधील ९० हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ प्रभाकर बुधवंत, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी नंदकुमार घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हिंमत माने पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल पासंगे, हवालदार सुरेश जाधव, पोलीस शिपाई नीलेश बिडकर, अनिल जुंदरे, संजीव हासे, सिद्धार्थ वाघमारे यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोरPoliceपोलिसPuneपुणे