शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"तुझाच मर्डर करणार होते...", काँग्रेस शहराध्यक्षाची भाजप शहराध्यक्षावर वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:46 IST

दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धीरज घाटे यांनी शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्स वरील राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली आहे...

- किरण शिंदे

पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्ष नते राहुल गांधी (rahul Gandhi( यांनी हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी पोस्टर लावून राहुल गांधींचा निषेध केला आहे. यावर आता काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो. त्याचाच मर्डर करणार होते असे म्हणत अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

अरविंद शिंदे म्हणाले, "पुणे शहर भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो. त्याचाच मर्डर करणार होते. त्याचे वागणे काय आहे त्यालाच विचारा. तू कधीही एकटा फिरू शकत नाहीस, तू कधीही मरशील, कारण तुझी कर्म तशी आहेत. तुमची लोक पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतात. कारण तुमची कर्मच तशी आहेत. जसे कर्म कराल तसे तुम्हाला भोगावे लागते." असे म्हणत अरविंद शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. 

मोदींचा चेहरा पाहण्यासारखा होता...

अरविंद शिंदे पुढे म्हणाले, हिंदूंच्या नावाने तुम्ही ज्या प्रकारे हिंसा करता ते हिंदूंना अपेक्षित नाही असे राहुल गांधींना सांगायचे होते. परंतु भारतीय जनता पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते आता शब्दांची फिरवाफिरवी करत आहे. मात्र जनता त्यांना भीक घालणार नाही. हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही तर तो इतर धर्माचा आदर करतो हेच राहुल गांधींना सांगायचे होते. हे सांगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पाहण्यासारखा होता. 

'हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल'

दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धीरज घाटे यांनी शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्स वरील राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसह 'खबरदार, हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल' असा मजकूर छापण्यात आला आहे. आणि याच पोस्टरवरून भाजप आणि काँग्रेस शहराध्यक्षात वाद पेटला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाcongressकाँग्रेस