पुणे : शिंदे सेना, रिपाइंला सोबत घेऊन युतीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढवण्याचा सुरुवातीपासूनच आमचा प्रयत्न आहे. आजही आम्ही युतीसाठी आशावादी आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. मात्र, एका नगरसेवकाच्या जिवावर ते सर्व जागा लढायची भाषा करतात, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिंदे सेनेच्या नेत्यांना लगावला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या मीडिया सेंटरचे उद्घाटन गुरुवारी मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहोळ बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते.
अजित पवारांवर टीका
राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजपकडून पुण्यातील गुन्हेगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मोहोळ म्हणाले, कोयता गँग संपली पाहिजे, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणतात. मात्र, त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली तर या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. हे त्यांच्या कोणत्या तत्त्वात बसते, कळत नाही. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढणार आहे, त्यामुळे पुणेकर मतदानातून त्यांना उत्तर देतील. गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही सकारात्मक नाही. वॉर्ड क्रमांक ३८ मध्ये प्रतिभा रोहिदास चोरघे या अनेक वर्षेे सामाजिक काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला माहीत नाही. पालकमंत्री म्हणतात शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना उमेदवारी देतात, ते त्यांच्या कोणत्या तत्त्वात बसते कळत नाही. त्यामुळे पुणेकर मतदानातून त्यांना उत्तर देतील.
कामाच्या जोरावर पुणेकर आम्हाला मते देतील
केंद्र, राज्य आणि महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून आम्ही पुण्यासाठी अनेक प्रकल्प दिले. अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामाच्या जोरावर महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर आम्हाला मते देतील, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.
Web Summary : Muralidhar Mohol targets Shinde Sena over PMC election ambitions, advocating for a BJP-led alliance. He criticizes Ajit Pawar for fielding candidates with criminal backgrounds, asserting BJP prioritizes development and public service, expecting Pune citizens to support them based on their work.
Web Summary : मुरलीधर मोहोल ने पीएमसी चुनाव की महत्वाकांक्षाओं पर शिंदे सेना पर निशाना साधा, भाजपा के नेतृत्व वाले गठबंधन की वकालत की। उन्होंने आपराधिक पृष्ठभूमि वाले उम्मीदवारों को मैदान में उतारने के लिए अजित पवार की आलोचना की, और कहा कि भाजपा विकास और सार्वजनिक सेवा को प्राथमिकता देती है, पुणे के नागरिकों से उनके काम के आधार पर समर्थन की उम्मीद है।