मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:45 IST2025-12-20T11:45:32+5:302025-12-20T11:45:46+5:30
मैत्रिपूर्ण लढतीचे काही निकष पाळले पाहिजेत. एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते घेऊ नयेत, असे ठरले असताना भाजप आपले कायकर्ते पक्षात घेत आहे

मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. पण, मैत्रिपूर्ण लढत म्हणातात, मग आपले कार्यकर्त भाजपमध्ये का घेतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून आघाडीचे प्रस्ताव आले आहेत. त्याचा विचार करावा, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी विविध महापालिकांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यात पुणे महापालिकेच्या निवडणुकीविषयी शहरातील पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. पण, भाजप आणि आपल्या पक्षात मैत्रिपूर्ण लढत म्हणातात, मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? मैत्रिपूर्ण लढतीचे काही निकष पाळले पाहिजेत. एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते घेऊ नयेत, असे ठरले असताना भाजप आपले कायकर्ते पक्षात घेत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून आघाडीचे प्रस्ताव आले आहेत. त्याचा विचार करावा, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ७११ इच्छुकांचे अर्ज दाखल
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ७११पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे