म्हणून शनिवारवाड्यात आजही ऐकू येतात किंचाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 17:13 IST2017-10-25T15:05:07+5:302017-10-25T17:13:50+5:30
ज्या शनिवारवाड्यात नारायणरावांची १४व्या वर्षी हत्या करण्यात आली होती, तिथे जायला आजही घाबरतात पर्यटक.

म्हणून शनिवारवाड्यात आजही ऐकू येतात किंचाळ्या
मराठ्यांचं साम्राज्य असलेल्या पुण्यातील शनिवारवाड्यातही भुतांचं साम्रज्य आहे, असं म्हटलं जातं. काही स्थानिकांनी तिथे ‘काका मला वाचवा’ अशा किंचाळ्याही ऐकल्या आहेत. या विदारक किंचाळ्यांमागचं कारण तुम्हाला माहितेय का?
मराठा साम्राज्याचे पाचवे वंशज नारायणराव पेशवा यांची वयाच्या १४व्या वर्षी हत्या झाली होती. लहान वयात साम्राज्य त्याच्या हाती गेल्याने त्यांच्या नातेवाईंकाचा हिरमोड झाला होता. या रागातच नारायण पेशवा यांची हत्या करण्यात आली होती. मारेकरी जेव्हा त्यांची हत्या करण्यासाठी आले होते तेव्हा ते धाय मोकलून ओरडत संपूर्ण वाडा फिरत होते. आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ‘काका मला वाचवा’ असा आर्जव करत त्यांनी संपूर्ण वाडा पालथा घातला. मात्र तरीही त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली, त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही. त्यामुळे त्यांची ही आरोळी आजही ऐकू येते, असं तेथील स्थानिक म्हणतात. सायंकाळी ६.३० नंतर या वाड्यात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात येतो. शनिवारवाड्याला ऐतिहासिक दर्जा लाभला असला तरी या भयानक आवाजामुळे अनेक पर्यटक जाण्यास घाबरतात. काही पर्यटक कुतुहूलापोटीही तिथे आवर्जून भेट देतात. संध्याकाळी तिथे 'लेझर शो' होतो , तो पाहायला मात्र बरीच लोकं हजर असतात.