यशस्वी चित्रपटासाठी कोणताही ठराविक फॉर्म्युला नाही : राजकुमार हिरानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 14:21 IST2021-05-06T04:11:44+5:302021-05-06T14:21:23+5:30
पुणे : यशस्वी चित्रपटासाठी कोणताही ठरावीक फॉर्म्युला नसतो असा मूलमंत्र प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी विद्यार्थ्यांना दिला. फिल्म अँड ...

यशस्वी चित्रपटासाठी कोणताही ठराविक फॉर्म्युला नाही : राजकुमार हिरानी
पुणे : यशस्वी चित्रपटासाठी कोणताही ठरावीक फॉर्म्युला नसतो असा मूलमंत्र प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी विद्यार्थ्यांना दिला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने (एफटीआयआय) आयोजित ऑनलाईन संवादात ते बोलत होते.
एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एफटीआयआयचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळा संवाद साधला. एफटीआयआयचे अध्यक्ष शेखर कपूर उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या संवाद सत्रात हिरानी यांनी एफटीआयआयमध्ये विद्यार्थी असतानाचे अनुभव, चित्रपट क्षेत्रात करावा लागलेला संघर्ष, दिग्दर्शनाचे विविध पैलू, स्टाईल यासह त्यांच्या मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स या चित्रपटांबद्दलचे काही किस्से सांगितले. गप्पांमध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ५ यशस्वी चित्रपटांबद्दलची यशोगाथाही उलगडली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हिरानी यांनी यशस्वी चित्रपटाचे कोणतेही असे सूत्र ठरलेले नाही. चित्रपट हे एक सर्जनशील माध्यम आहे आणि यशाचे स्वत:चे नियम ठरलेले आहेत. त्यांची स्वत:ची एक वेगळी शैली असल्याचे सांगितले.