शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नाही

By admin | Updated: June 25, 2015 03:38 IST

तब्बल चार हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या पुणे महापालिकेकडे शहरातील लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी

पुणे : तब्बल चार हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या पुणे महापालिकेकडे शहरातील लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील प्रमुख १८ पुलांचे महापालिकेने तब्बल १५ वर्षांनंतर आॅडिट केले असले, तरी या आॅडिटमध्ये सुचविण्यात आलेली या पुलांची देखभाल दुरुस्तीची कामे केवळ निधी नसल्याने कागदावरच असल्याचे समोर आले आहे. मुठा नदीवर असलेले अनेक पूल हे ५० वर्षांहून अधिक जुने असतानाही त्याच्याकडे महापालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टीने काणाडोळा केला जात आहे.शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मुठा नदीमुळे शहराचे दोन भाग पडलेले आहेत. या दोन्ही भागांना जोडणारे सर्व पूल जुने असून, यावरून दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात येते, तशीच पुलांचीही देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. १९९७-९८ मध्ये महापालिकेकडून या पुलांचे सेफ्टी आॅडिट करण्यात आलेले होते. त्यानंतर काही पुलांची किरकोळ स्वरूपातील दुरुस्ती करण्यात आली. त्या नंतर महापालिकेने थेट २०१३-१४ मध्येच काही पुलांच्या आॅडिटचे काम हाती घेतले होते. त्याचा अहवालही महापालिकेस प्राप्त झाला. त्यात अनेक पुलांची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, केवळ निधी नसल्याने प्रशासनाने हा आॅडिट अहवाल गुंडाळून ठेवला आहे.