शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2026: पुण्याच्या शासकीय ग्रंथागारात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:51 IST

आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही. केवळ एकच कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे पुस्तक होते. - ग्रंथागार प्रतिनिधी

पुणे: पुणे स्टेशन परिसरात असलेले शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार. बंद होण्याची वेळ ५ वाजता. तरीही कदाचित खुले असेल या अपेक्षेने 'लोकमत' प्रतिनिधीने ग्रंथालय गाठले. मात्र, पदरी निराशाच पडली. तरीही दरवाज्याला कुलूप लावले नसल्याने कडी ठोठावून कुणाला तरी बाहेर बोलाविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एकजण बाहेर आला. त्या वेळी ग्रंथागार प्रतिनिधीशी साधलेला हा संवाद.

मी : नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके मिळतील का? गुरुवारी (दि. १९) शिवजयंती आहे. त्यामुळे पुस्तकांची खरेदी करायची होती.ग्रंथागार प्रतिनिधी : पण, आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही. केवळ एकच कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे पुस्तक होते. त्याची प्रतही संपली आहे.पुण्यातील शासकीय ग्रंथालयातील हे वास्तव समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे गौरवग्रंथ, जीवनचरित्र किंवा कुठल्याच प्रकारचे साहित्य शासकीय ग्रंथालय येथे उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

राज्य सरकारतर्फे तयार करण्यात आलेले साहित्य पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथे छपाई होऊन ते विक्रीसाठी उपलब्ध असते. पुण्यातील फोटो झिंको प्रेससह राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जनगणना कार्यालय भाषा संचालनालय, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सामान्य प्रशासन विभाग, विधानमंडळ, तसेच इतर कार्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उपलब्ध नसल्याचा आरोप पुणे जिल्हा ग्रंथालय संघाने केला आहे. राज्य सरकारच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दर्जेदार साहित्य नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिले जाते. शासनाकडे प्र. न. देशपांडे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ अशी दोन लहान पुस्तके उपलब्ध होती. मात्र, आता या पुस्तकांच्या आवृत्त्याही संपल्या आहेत. त्यामुळे शासकीय ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकेच नसल्याचे पाहायला मिळत आहे. केळुस्कर यांनी लिहिलेले चरित्र खासगी प्रकाशकांनी प्रसिद्ध केल्याने ते उपलब्ध आहे. मात्र, या पुस्तकासह खासगी प्रकाशनांची इतर पुस्तके महाग असल्याने सर्व वाचकांपर्यंत ती पोहोचू शकत नाहीत.

ज्याप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चरित्र साधने प्रकाशन समिती, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, याच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य नाममात्र किमतीत शासनातर्फे उपलब्ध करून दिले जाते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करून छत्रपती शिवाजी महारांजाविषयी दर्जेदार साहित्य नाममात्र किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिली पाहिजेत, अशी भावना पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर कपोते यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवग्रंथ, जीवनचरित्र किंवा कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे १९ खंड ज्याप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयांना राज्य शासनाने मोफत वाटले, त्याचप्रमाणे शासकीय ग्रंथालयांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची चरित्रे मोफत उपलब्ध करून द्यावीत, तसेच साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेले सेतुमाधवराव पगडी लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे चरित्रही उपलब्ध व्हावे. - चंद्रशेखर कपोते, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ

 

English
हिंदी सारांश
Web Title : No Shivaji Maharaj books at Pune government library before Shivjayanti.

Web Summary : Pune's government library lacks books on Shivaji Maharaj before Shivjayanti. Only one, now unavailable, existed. The Pune District Library Association criticizes the absence and requests government-provided literature at affordable prices.
टॅग्स :PuneपुणेShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEducationशिक्षणStudentविद्यार्थीSocialसामाजिक