शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 15:50 IST

पक्षाचा काही त्रास नाही, पदाधिकऱ्यांचा काही त्रास नाही, कोणालाही दोष देऊन देऊन मी बाहेर पडत नाहीये

पुणे: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याने पक्षाला रामराम केला आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील मनसेचे पदाधिकारी रणजित शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडली. कुठलंही कारण नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. 

शिरोळे म्हणाले, मी रणजित शिरोळे पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षाबरोबर काम करतोय. पक्षाने माझ्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. पक्षानं अंतर्गत  जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्याही व्यवस्थित पार पाडल्या. मी शिवाजीनगर विभागात सातत्याने काम करत रहिलो. या घडामोडीत मी निवडणूक कशी लढवावी हे विचार करत होतो. पण आता मी मनसे सरचिटणीस आणि प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. आपणही काळाबरोबर बदललं पाहिजे. म्हणून राजीनामा देत आहे. पक्षाला कंटाळून मी बाहेर पडत नाहीये. राज ठाकरे त्यांच्यासाठी माझा आदर कायम राहणार आहे. पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांकडून मला त्रास नाही. कोणालाही दोष देऊन मला बाहेर पडायचं नाहीये.

उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्ही बाहेर पडत आहे असा काही नाही. शिवाजीनगरला उमेदवारी जाहीर झालीच नाही. उमेदवारी बाबत काय घडलं हे काय सांगू शकत नाही. जर शिवाजीनगरला उमेदवारी जाहीर झाली असती. आणि मला मिळाली नसती तर मला का नाही दिली? असा प्रश्न मी विचारला असता. तसही काही नाहीये. मी इच्छुक होतो. पण आता मी या अशा भूमिकेत आहे कि निवडणूक लढणार आहे का नाही? बैठकांमध्ये उमेदवारीबाबत कुठं विषय झाला नाही. आठही विधानसभा मतदार संघांवर चर्चा झाली. पण त्यामध्ये उमेदवारीबाबत काही चर्चा नाही झाली. पक्षसंघटन, पक्षाची ताकद याबाबत चर्चा झाली. हा रागातून घेतलेला निर्णय नाही. पक्षाचं काम थांबून पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PoliticsराजकारणMLAआमदार