"तिथे भाजपचं सरकार नाही, म्हणून न्याय मिळाला!" अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या FIR वरून युगेंद्र पवारांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:46 IST2026-03-25T13:38:58+5:302026-03-25T13:46:16+5:30
युगेंद्र पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट कर्नाटक सरकारचे आभार मानत, महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

"तिथे भाजपचं सरकार नाही, म्हणून न्याय मिळाला!" अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या FIR वरून युगेंद्र पवारांचा निशाणा
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाने आता एक नवीन वळण घेतले आहे. या अपघात प्रकरणाची बंगळुरूमध्ये 'झिरो एफआयआर' दाखल झाली. यावर आता युगेंद्र पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट कर्नाटक सरकारचे आभार मानत, महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
"दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, ही आमची मागणी होती. कर्नाटकात भाजपचे सरकार नसून काँग्रेसचे सरकार आहे, म्हणूनच तिथे आम्हाला न्याय मिळाला असावा, असा टोलाही युगेंद्र पवार यांनी लगावला. तिथल्या प्रशासनाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत 'झिरो एफआयआर' दाखल केला, त्याबद्दल मी कर्नाटक सरकारचे आभार मानतो, असेही पवार म्हणाले.
बंगळुरूमध्ये दाखल झालेला हा 'झिरो एफआयआर' आता तांत्रिक प्रक्रियेनुसार महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करावा लागणार आहे. यावर भाष्य करताना युगेंद्र पवार म्हणाले की, "आता हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांकडे येईल. आम्हाला अपेक्षा आहे की, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होईल, जेणेकरून सत्य समोर येईल आणि आम्हाला न्याय मिळेल.
'झिरो एफआयआर' काय आहे?
कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा घडल्याचे ठिकाण महत्त्वाचे न ठरवता तक्रार नोंदवून घेण्याच्या प्रक्रियेला 'झिरो एफआयआर' म्हणतात. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी आता पोलिसांच्या मार्फत पुन्हा होऊ शकते.