शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

...तर तुम्हाला ४९ हजार रुपये चार्जेस पडतील" क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या नादात गमावले दीड लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:37 IST

कार्डवरील सर्व्हिसेस डि अॅक्टीव्ह करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

पुणे : शिक्षिका असलेल्या महिलेने खर तर क्रेडिट कार्डचा कधी वापर केला नव्हता. सायबर चोरट्या महिलेने त्या क्रेडिट कार्डवर २ सर्व्हिसेस अॅक्टीव्ह झाल्या असल्याचे सांगून त्याचे ४९ हजार चार्जेस लागतील, ते पडू नये, म्हणून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन दीड लाख रुपयांना गंडा घातला.

याप्रकरणी आंबेगाव येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ मार्च २०२२ रोजी घडला होता. बँका तसेच पोलीस सातत्याने आपला पासवर्ड किंवा ओटीपी कोणाला सांगू नका असे सांगत असतात. मोबाईलवर बँका मेसेज पाठवत असतात. मात्र, प्रत्यक्ष अशी घटना तुमच्यासमोर आली तर या सर्व बाबी बहुतांश सुशिक्षित विसरुन जातात अन सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात. फिर्यादी महिला शिक्षिकेच्या बाबतीतही असेच घडले.

फिर्यादी यांचे पती सॉफ्टवेर कंपनीत नोकरी करतात. त्यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आय सी आय सी बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड घेतले होते. मात्र, त्याचा वापर कधी केला नव्हता. ४ मार्च रोजी त्यांना आय सीआय सीआय बँकेतून बोलत असल्याचा एका महिलेचा फोन आला. तुमच्या क्रेडिट कार्डवर दोन सर्व्हिसेस अॅक्टीव्हेट झाल्या आहेत. त्या सर्व्हिसेस डी अॅक्टीव्हेट केल्या नाहीतर तर तुम्हाला ४९ हजार रुपये चार्जेस पडतील, अशी भिती दाखवली. आपल्याला ४९ हजार रुपये भरायला लागू नये, म्हणून ती महिला सांगेल, त्याप्रमाणे फिर्यादी कृती करीत गेल्या. तिने या सर्व्हिसेस डी अॅक्टीव्हेट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर पाठविलेला एक कोड सांगा असे सांगितले. त्यांनी मेसेजमधील कोड तिला सांगितला. त्यानंतर तिने फिर्यादी यांना आय मोबाईल अॅप्लीकेशन उघडण्यास सांगितले. त्यासाठी कोणतेही चार्जेस पडणार नाहीत, असे म्हणाल्यावर फिर्यादी यांनी मोबाईलमधील आय मोबाईल अॅप्लिकेशन उघडून ती महिला सांगेल, त्याप्रमाणे स्टेपस करत गेल्या. त्यानंतर त्यांना त्याचवेळी आय सी आय सी बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती विचारल्यानंतर त्यांनी त्यावर विश्वास ठेवून सर्व माहिती दिली. त्यानंतर १० ते १५ मिनिटात त्यांच्या मोबाईलवर ९९ हजार १४४ व ५० हजार ८२२ रुपये क्रेडिट कार्डवरुन कट झाल्याचे मेसेज आले. त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दिली. त्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाWomenमहिला