शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

...तर व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर होणार गुन्हे दाखल; कोरेगाव भीमा मानवंदना कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 15:50 IST

ग्रुप अ‍ॅडमिनला अटक व आरोपींना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते..

ठळक मुद्देआक्षेपार्ह पोस्ट , व्हिडीओ संदर्भात ५३० ग्रुप अ‍ॅडमिनला बजावल्या नोटिसा

कोरेगाव भीमा : व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर १ जानेवारी मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाज विघातक पोस्ट , मजकुर , व्हिडिओ , आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनवर सर्वस्वी जबाबदार धरुन प्रचलित नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असुन याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२० ग्रुप अ‍ॅडमिन व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४१० ग्रुप अ‍ॅडमिनला त्यासंधर्भात तशा लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या असल्याने यापुढिल काळात ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.       १ जानेवारी २०१८ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार परिसरात न घडु देण्यासाठी गतवर्षीपासुन जिल्हाप्रशासन व पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाले असुन छोट्या छोट्या गोष्टींवरही जिल्हा पोलीस प्रशासनाचे बारकाईने अभ्यास केला आहे. दंगलीच्यानंतर व्हाटस्अ‍ॅप ग्रुप , फेसबुक , सारख्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातुन समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट व्हिडीओ पसरवित असतात. त्यातुन सामाजीक स्वास्थ्य बिघडले जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जानेवारी २०२१ च्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापुर पोलीस ठाण्यातील १२० व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ४१० ग्रुप अ‍ॅडमिनला या संधर्भात नोटिसा बजाविण्यात आल्या असुन व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट , मजकुर , व्हिडिओ , आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनवर सर्वस्वी जबाबदार धरुन प्रचळीत नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असुनया नोटिसा गुन्हा शाबितीकरणासाठी न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहेत. यात ग्रुप अ‍ॅडमिनवरच गुन्हा दाखल होऊन या गुन्ह्यात तीन वर्ष शिक्षाही भोगावी लागणार असल्याने ग्रुप अ‍ॅडमिनला येत्या काळात आपल्या ग्रुपवर लक्ष देण्याची गरज असल्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.

ग्रुप अ‍ॅडमिन सावधान गुन्हा दाखल होईल    परिसरातील व्हॉट्‌सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन व ग्रूपमधील सभासदांनी ग्रुपवर समाजविघातक , व आक्षेपार्ह मजकुर व्हिडीओ पोस्ट केल्यास किंवा कॉपी करुन इतर ठिकाणी सोशल मिडीयावर प्रसारीत केल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला अटक करून कारवाई करण्यात येणार असल्याने आरोपींना कमाल तीन वर्ष शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनने सावधान राहण्याच्या सुचना पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिस