शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

...तरचं रुग्णांना सुरू करा अँटीव्हायरल औषधे" देशभरात व्हायरल फिव्हरने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 13:07 IST

१०२ डिग्रीपेक्षा जास्त ताप, घसा दुखी, नाक गळत असल्यास उपचार अनिवार्य; केंद्रीय आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

पुणे: ‘रुग्णांना जर १०२ डिग्रीपेक्षा जास्त ताप असेल (हायग्रेड फिव्हर), घसादुखी, नाक गळत असेल. साेबत खाेकला, अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया व उलट्या अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांना तातडीने ‘ऑसेल्टेमिव्हिर’ ही अँटीव्हायरल औषधे सुरू करावीत,’ अशा सूचना केंद्रीय आराेग्य विभागाने प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स यांना निर्गमित केल्या आहेत. सध्याच्या व्हायरल फिव्हरचे वाढत्या रुग्णांची संख्या पाहता या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आराेग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये म्हटले आहे की, सध्या देशभरात इन्फ्ल्युएन्झा ए, बी, सीच्या विषाणूंची संख्या वाढलेली आहे. साेबतच ‘इन्फ्ल्युएन्झा ए’चा उपप्रकार असलेल्या ‘एच ३ एन २’ याचेही रुग्ण वाढलेले आहेत. याचबराेबर सारी, एच १ एन १, इन्फ्ल्युएन्झा ए लाईक इलनेस, ॲडेनाेव्हायरस या विषाणूंचाही प्रादुर्भाव झालेला प्रयाेगशाळांच्या तपासणीतून पुढे येत आहे. त्याला प्रामुख्याने पाच वर्षांच्या आतील मुले, वयाेवृद्ध यांच्यामध्ये प्रसार हाेत आहे.

अशावेळी त्यांचे वेळीच निदान करून त्यांना अँटीबायाेटिक न देता अँटीव्हायरल औषधे सुरू केल्यास त्यांची तब्येत सुधारण्यास मदत हाेते, असे आधीच सांगितलेले आहे. म्हणून हे उपचारांच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. हीच मार्गदर्शक तत्त्वे पुढे राज्यांना व राज्याच्या आराेग्य खात्याने पुढे सर्व सरकारी व खासगी डाॅक्टरांना, संस्थांना निर्गमित केल्या आहेत.

असे आहेत उपचारांचे प्राेटाेकाॅल

- साधा ताप, खाेकला, घसादुखी यासाठी स्वॅब घेणे गरजेचे नाही. ऑसेल्टेमिव्हिरसारखी अँटीव्हायरल औषधांचा वापर करण्याची गरजही नाही. अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया आणि मळमळ यांच्यावर लक्षणानुसार उपचार करण्याची गरज असून, रुग्ण निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे.- अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया, नाक गळणे आणि मळमळ यांसह १०२ पेक्षा अधिक ताप असेल तर ताे हायरिस्क पेशंट समजून उपचार करणे आवश्यक आहे. अशा रुग्णांचा स्वॅब घेण्यासह ऑसेल्टेमिव्हिर अँटीव्हायरल औषधांचा डाेस सुरू करावा.- अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया, नाक गळणे, मळमळ यांसह १०२ पेक्षा अधिक ताप असेल, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब, नखे निळी पडणे, मुलांमध्ये गुंगी आणि चिडचिड अशी लक्षणे आढळत असतील तर अशा रुग्णांचा स्वॅब तपासणे आवश्यक आहे. तसेच त्यांना रुग्णालयात ॲडमिट करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात यावेत.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्यSocialसामाजिक