शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

...तर ‘ससून’ला नेले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:53 AM

पीएमपी वाहकाची अरेरावी; हात दाखवूनही बस नाही थांबली

पुणे : सातारा रस्त्यावरील पंचमी बसथांब्यावर निगडीला जाणाऱ्या पीएमपीची वाट पाहत होते. ही बस थांब्यावर येऊनदेखील थांबली नाही. त्यामुळे पळत जाऊन मी बसमध्ये चढले. वाहकाला म्हणाले, ‘बस का थांबवली नाही? मी बसमध्ये येताना अपघात झाला असता तर..?’ यावर वाहक म्हणाला, ‘ते चालकाला सांगा आणि काही झाले असते, तर ससूनला नेले असते...’ हा अनुभव आहे एका महिला प्रवाशाचा. वेळ मंगळवारी सकाळी ११ ची आणि बसचा क्रमांक एमएच १२-सीटी ००६१ हा होता.पीएमपीचे चालक भरधाव बस चालवतात, अनेक थांब्यांवर ते गाडी न थांबवता पुढे नेतात, असे अनुभव अनेकदा प्रवाशांना येतात. परंतु, सध्या वाहक प्रवाशांवर अरेरावी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे प्रवाशांच्या म्हणण्यावरून दिसून येत आहे.तुकाराम मुेढे हे पीएमपीचे अध्यक्ष असताना सर्व सुरळीत चालले होते. नियम मोडणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे निमूटपणे कर्मचारी काम करायचे; परंतु मुंढे यांची बदली झाली आणि पीएमपीच्या कर्मचाºयांमधील उद्धटपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पीएमपी वेळेवर येत नाहीत, तर अनेकठिकाणी दोन-दोन बस बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.पीएमपीचे चालक थांब्यावर बस थांबवत नसल्याने अनेकांना कामाला किंंवा शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. एका प्रवाशाला मंगळवारी सकाळी सातारा रस्त्याहून निगडीची बस पकडायची होती. त्यामुळे तो पंचमी येथील थांब्यावर बसची वाट पाहत होता. बस आली तेव्हा या प्रवाशाने चालकाला हात दाखविला; परंतु त्याने बस थांबवलीच नाही. तशीच पुढे दामटली. तेव्हा प्रवाशाने पळत जाऊन बस पकडली. बसमध्ये गेल्यानंतर वाहकाला ‘बस का थांबवली नाही? मला पळत पळत बसमध्ये यावे लागले, जर अपघात झाला असता, तर काय केले असते तुम्ही?’ असे प्रवासी म्हणाला. यावर वाहक म्हणाला, ‘ते तुम्ही चालकाला सांगा की, का बस थांबवली नाही आणि तुम्हाला काही झाले असते, तर ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले असते.’ वाहकाच्या या बोलण्यावर बसमधील इतर प्रवासीदेखील संतापले. ‘या वाहकांना आता कोण बोलणार? मुंढे गेल्यामुळे यांचा मुजोरपणा वाढतोय,’ अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.मुंढे गेल्यामुळे कर्मचाºयांमधील शिस्त शून्य झाली आहे. कसल्याही प्रकारचा आणि कोणाचाही त्यांना दरारा राहिलेला नाही. अधिकारी पूर्णत: मोकाट सुटले आहेत. काही वाहक बस चालवताना मोबाइलवर बोलतात. मोटार वाहन कायद्याप्रमाणे अशा चालकाचे लायसन्स रद्द केले पाहिजे. कुठलीही बस वेळेवर येत नाही. कोणावरही कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे वाहकांचा उद्धटपणा वाढला आहे. किंबहुना, प्रवासी मंचाच्या काही कार्यकर्त्यांकडून तक्रार केली असता, हेल्पलाईनला दमदाटी केली जाते. बसमध्ये प्रवासी सुरक्षितता राहिलेली नाही.- जुगल राठी, प्रवासी मंच

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल