...तर पुणे,मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार; मंत्री अनिल परब यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 04:44 PM2021-06-18T16:44:52+5:302021-06-18T16:45:58+5:30

राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील..

... then Pune, Mumbai and other municipal elections will be held on time; Anil Parab's big statement | ...तर पुणे,मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार; मंत्री अनिल परब यांचे संकेत

...तर पुणे,मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार; मंत्री अनिल परब यांचे संकेत

Next
ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळ नवीन ७०० बस घेणार

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील. मात्र, कोरोना नियंत्रणात राहिल्यास महापालिकांच्या निवडणुका नियोजित वेळेतच होतील, असे स्पष्ट संकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यावर अनिल परब पुण्यात आले होते. त्यानंतर अनौपचारिक कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील कोरोना प्रदूर्भाव कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना नियमांचे पालन करावे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास उद्योग, व्यावसाय, दळणवळण पूर्ण क्षमतेने सुरू होऊन राज्य प्रगतीपथावर येण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे. 
-------
सरकार मराठा आरक्षणाचा बाजूने

खासदार संभाजीराजे आणि मराठा समाजातील विविध संघटना यांच्याबरोबर सरकार सातत्याने संवाद साधत आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने सरकार आणि शिवसेनेची देखील सकारात्मक भूमिका आहे. त्याचबरोबर इतर सर्व समाजच्या न्याय, हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 
-------
एसटी डेपोवरील पेट्रोल पंप खुले करणार

एसटी महामंडळाचा आर्थिक स्त्रोत बळकट करण्यासाठी राज्यातील सर्व डेपोवरील पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. सध्या या डेपोवर फक्त महामंडळाच्या बसमध्ये पेट्रोल, डिझेल भरले जात आहे. त्यामुळे शासनाच्या विविध विभाग, खात्याच्या गाड्या किंवा खासगी गाड्यांनाही या डेपोवर पेट्रोल, डिझेल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन आहे. त्यातून महामंडळाला उत्पन्नाचे एक निश्चित साधन निर्माण होणार आहे. त्यामुळे लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ, असे मंत्री परब यावेळी म्हणाले. 
--------
प्रत्येक स्टॅंडवर प्रवाशांना मूलभूत सुविधा देणार

फार हायफाय नाही, पण राज्यातील प्रत्येक एसटी स्टॅंडवर प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी, प्लॅटफॉर्मवर आसन व्यवस्था आणि स्वछतागृह या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक डेपोला सूचना केल्या असून त्यांचे काम सुरू आहे.

Web Title: ... then Pune, Mumbai and other municipal elections will be held on time; Anil Parab's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app