शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:53 IST

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं', उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

पुणे : पुण्याला बाजीराव पेशव्यांसारखा इतिहासातील महान सेनानी लाभलेला असून, त्यांच्या कार्याला गौरवण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. संभाजी ब्रिगेडने या मागणीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने मेधा कुलकर्णी यांचा बॅनरच्या माध्यमातून समाचार घेतल्याचे दिसून आले आहे. 

पुणे शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. ''कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं'', असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आलाय, ही मागणी करणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करण्यात आली. या मागणीच्या निमित्ताने पुण्यात भाजप आणि ठाकरे सेना आम्ही सामने आल्याचे पाहायला मिळालं आहे. 

नेमकं काय म्हणाल्या कुलकर्णी? 

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे.. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे.. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे.. या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे.. थोरली बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही.. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात.. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात.. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा कुरली बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

कुलकर्णी यांची मागणी अत्यंत चुकीची

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. पुणे शहर वसवले. त्यांनी जर हे केले नसते तर पुण्याची निर्मिती झाली असती का. तर पेशवे वगैरे शौर्य गाजवू शकले असते का? पेशव्यांसारखे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मुळे तयार झाले आहेत. आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य चालू शकतो ही भावना राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव दिले पाहिजे. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे.. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करतो असे श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेmedha kulkarniमेधा कुलकर्णीpune railway stationपुणे रेल्वे स्थानकPeshwaiपेशवाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा