लॉकडाऊनमध्ये 'त्यांचा' विवाहसोहळा होता रखडला शेवटी चंद्रकांत दादांनीच तो मुहूर्त जुळवुन आणला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:43 PM2020-05-12T17:43:16+5:302020-05-12T17:44:25+5:30

लग्न लागणार की नाही अशा विवंचनेत असलेल्या या जोडप्याच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले धावून...

'Their' wedding ceremony was stuck in 'lockdown'; but Chandrakant Dada patil arranged that moment | लॉकडाऊनमध्ये 'त्यांचा' विवाहसोहळा होता रखडला शेवटी चंद्रकांत दादांनीच तो मुहूर्त जुळवुन आणला 

लॉकडाऊनमध्ये 'त्यांचा' विवाहसोहळा होता रखडला शेवटी चंद्रकांत दादांनीच तो मुहूर्त जुळवुन आणला 

Next
ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांची झाली मदत; पोलिसांच्या परवानगीसह केली अन्य तयारी

पुणे : जानेवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला... एप्रिलमध्ये विवाहाची तारीख ठरली... अचानक कोरोनाचा उद्रेक झाला आणि दोन वेळा विवाह पुढे ढकलावा लागला... लग्न लागणार की नाही अशा विवंचनेत असलेल्या या जोडप्याच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते धावून आले आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोघांचा मंगल परिणय घडवून आणला.
गुलटेकडी येथील डायस प्लॉट वसाहतीमध्ये राहणाऱ्या प्रशांत सलगर (वय 28) आणि मार्केट यार्ड येथील प्रेमनगर वसाहतीमधील रेखा सोनटक्के (24) असे याजोडप्याचे नाव आहे. रविवारी त्यांनी लक्ष्मीनारायण सिनेमागृह चौकातील तक्षशिला बुद्धविहारामध्ये सहजीवनाची शपथ घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले, झोपडपट्टी आघाडी सरचिटणीस गणेश शेरला आदी उपस्थित होते. प्रशांत हा सजावटीची कामे करतो. तर, रेखा ही छोटी-मोठी कामे करते. जानेवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिलमध्ये त्यांचा विवाह होणार होता.त्याकरिता बिबवेवाडीतील एक मंगल कार्यालय नक्की करण्यात आले होते. परंतू, कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि त्यांचा विवाह रखडला.लॉक डाऊन उठेल या आशेने त्यांनी दोन वेळा विवाह पुढे ढकलला. परंतू,कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने त्यांच्या लग्नाच्या आशा मावळूलागल्या होत्या. विवाह होणार की नाही असा प्रश्न पडलेल्या कुटुंबियांची समस्या लक्षात घेऊन गणेश शेरला यांनी कुटुंंबाला अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्याचा सल्ला दिला. त्यांची समजूत काढली. गुलटेकडीएकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विवाह लावण्याचे ठरविले. लग्नाचा दिवस ठरल्यानंतर पोलिसांच्या परवानगीसह अन्य तयारी करण्यात आली. दरम्यान,स्वारगेट परिसरात आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनानगरसेवक भिमाले व शेरला यांनी ही माहिती दिली. पाटील यांनी या लग्नालाउपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली.
अगदी साध्या पद्धतीने या दोघांचा मंगल परिणय तक्षशिला बुद्ध विहारामध्ये पार पडला. या विवाहाला प्रशांतचा मोठा भाऊ, मुलीची आई, बुद्ध विहाराचेअध्यक्ष गणेश चव्हाण, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे, भन्ते सुनील गायकवाडउपस्थित होते. पाटील यांच्या उपस्थितीमुळे दोन्ही कुटुंब भारावून गेलीहोती. प्रशांतने लग्नासाठी प्रयत्न केल्याने सर्वांचे आभार मानले.

Web Title: 'Their' wedding ceremony was stuck in 'lockdown'; but Chandrakant Dada patil arranged that moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.