Pune: नसरापुरात दरवाजाची कडी-कोयंडे तोडून अडीच लाखांच्या ऐवजाची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 21:19 IST2023-07-24T21:19:26+5:302023-07-24T21:19:54+5:30
नसरापूर (पुणे) : घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी २ लाख ५४ हजारांचे दागिने अन् मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. राजगड ...

Pune: नसरापुरात दरवाजाची कडी-कोयंडे तोडून अडीच लाखांच्या ऐवजाची चोरी
नसरापूर (पुणे) : घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी २ लाख ५४ हजारांचे दागिने अन् मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी (दि. २२) मध्यरात्री नसरापूर (चेलाडी ) येथील कॉस्मॅटिक कंपनीच्या पाठीमागे घरफोडी करण्यात आली. याप्रकरणी राजेश श्यामराव कदम यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदम हे पुण्यात वास्तव्याला असून, सुटीच्या दिवशी ते नसरापूरला येतात. तेथील कामगार हरिश्चंद्र ठोंबरे यांना बंद घराचा दरवाजा कुलूप तुटलेला दिसला. त्यावेळी त्यांनी कदम यांना घटना स्थळी बोलावून घेतले त्यानंतर फिर्यादी कुटुंबासह घरी आले असता, त्यांना कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील एकूण २ लाख ५४ हजार किमतीच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे समजले. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.