शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ११ मंदिरांमध्ये चोरी; सीसीटीव्हीमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, पुण्याच्या ग्रामीण भागातील घटना

By नम्रता फडणीस | Updated: August 6, 2024 16:29 IST

२ लाखांचे दागिने आणि मुखवटे, ८० हजारांचे पूजा साहित्य चोरट्याकडून जप्त करण्यात आले

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर , रांजणगाव, खेड भागातील मंदिरातून रक्कम चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी तपास सुरु केला. मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर एका सराईत चोरट्याने चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्रापूर परिसरात त्याला सापळा रचून ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

 विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरुर, रांजणगाव, खेड परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने ग्रामीण भागातील ११ मंदिरात चोरी केल्याचे उघड झाले आहे . मंदिरात रात्रीच्या वेळी भाविकांची वर्दळ कमी असते. चोरट्याने मध्यरात्री गुन्हे केले. त्याच्याकडून १ लाख ६३ हजारांचे दागिने, एक लाख १७ हजारांचे चांदीचे मुखवटे, ८० हजारांचे पूजा साहित्य जप्त करण्यात आले. चोरीच्या घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. सराईत चोरटयाने चोरी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग यांना  तो शिक्रापूर परिसरात येणार असल्याची महिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यावेळी उपस्थित होते.    ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, शांताराम सांगडे, रमेश इचके, संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, मंगेश थिगळे यांनी ही कारवाई केली, तसेच पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी तपासात सहाय्य केले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTempleमंदिरThiefचोरMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारी