घरफोडी करून पावणेसहा लाखांचे दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 17:18 IST2019-11-07T16:39:01+5:302019-11-07T17:18:11+5:30

अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये ठेवलेले ५ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले..

theft of 5 lakhs 75 thousands jewellery | घरफोडी करून पावणेसहा लाखांचे दागिने लंपास 

घरफोडी करून पावणेसहा लाखांचे दागिने लंपास 

ठळक मुद्दे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

पिंपरी : राहत्या घराचा दरवाजा बंद असताना अज्ञात चोरट्यांने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.५) पारखेवस्ती माणगाव येथे घडली. याप्रकरणी विकास नवनाथ खोडसे (वय ३२, रा. पारखेवस्ती, माणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पाच ते बुधवारी सकाळी सहा या कालावधीत फिर्यादी विकास यांचे घर कुलूप लावून बंद होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेले ५ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून हिंजवडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Web Title: theft of 5 lakhs 75 thousands jewellery