शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात लॉकडाऊन उठताच वाहनचोरट्यांचे फावले; ६ दिवसांत ३७ वाहनांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 21:14 IST

जून महिन्यात ८१ वाहने चोरीला

पुणे : मागील दोन महिन्यात लॉकडाऊन असल्याने लोकांचे बाहेर फिरणे कमी झाले होते. गेल्या १५ दिवसात अनलॉक होऊन निर्बंध शिथिल होताच शहरातील वाहन चोरींच्या गुन्ह्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.  सोमवारी एकाच दिवसात शहरात ५ दुचाकी आणि एक चारचाकी वाहने चोरीला गेलेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या ६ दिवसात ३७ वाहने चोरीला गेली आहेत. जून महिन्यात आतापर्यंत सरासरी दररोज ४ वाहने चोरीला जात आहेत.

गेल्या वर्षी जून २० अखेर शहरातून ३४२ वाहने चोरीला गेली होती. त्याच्या तुलनेत आतापर्यंत ६११ वाहने चोरीला गेली आहेत. मे २०२१ अखेर शहरातून ५३० वाहने चोरीला गेली होती. गेल्या २१ दिवसात तब्बल ८१ वाहने चोरीला गेली आहेत.

गेल्या वर्षातील अनेक महिने कडक लॉकडाऊन होता. रस्ते निमनुष्य होते. असे असतानाही वर्षभरात ९७५ वाहने चोरीला गेली होती. त्यामध्ये ८७० दुचाकी, ७७ चारचाकी आणि २८ तीन चाकी वाहनांचा समावेश होता. त्यापैकी पोलिसांनी ३३० वाहने जप्त केली होती.पोलीस आयुक्त के. वेंकटेशन यांनी वाहनचोरी पथकासह काही पथके रद्द केली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेची पूर्नरचना करता दरोडा व वाहनचोरी पथकाचे दोन युनिट पुन्हा सुरु केली आहेत. असे असतानाही शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याtwo wheelerटू व्हीलरtheftचोरीPoliceपोलिस