शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातील १८ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 9:06 PM

टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देमुंबई येथून पोलीस दलातून एक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त

पुणे : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बँक खाते व डेबीट कार्डची माहिती घेऊन टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नंदा चौधरी (वय ५२, मगरपट्टा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा चौधरी यांचे पती मुंबई येथून पोलीस दलातून एक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना सेवानिवृत्तीनंतर काही रक्कम मिळाली होती. २९ जून २०१७ ते ९ जून २०१८ या कालावधीत त्यांच्या खात्याचा क्रमांक व डेबीट कार्ड यांची गोपनीय माहिती घेऊन टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने खात्यातील १८ लाख १६ हजार ८२० रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यावर नंदा चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) ए. के. बागवान करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसfraudधोकेबाजीCrimeगुन्हा