शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"तो व्हिडिओ बनावट, लोकेशन लपवण्यासाठी ॲपचा वापर"; भिगवण अपहरण प्रकरणात पडळकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:47 IST

भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Bhigwan Crime:  पुणे जिल्ह्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी एका तरुणीचे फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला होता. मात्र, आता या प्रकरणाला एक अनपेक्षित वळण मिळाले आहे. संबंधित तरुणीने स्वतः एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, आपले अपहरण झाले नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा व्हिडीओ जबरदस्तीने तयार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्वामी चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घराकडे जात होती. यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या जहीर शेख आणि अयान शेख या दोन तरुणांनी त्यांना अडवले. आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

भिगवण बंद आणि जनक्षोभ

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण बंदची हाकही देण्यात आली होती.

तरुणीचा व्हिडिओ आणि लव्हस्टोरीचा ट्विस्ट

पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच पीडित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीने, "माझे अपहरण झालेले नाही, मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले आहे. आमचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत आणि त्याने माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही. मी माझ्या मर्जीने घरातून निघून आले आहे. राजकीय पुढाऱ्यांनी तसे आरोप केले. परंतु मी माझ्या मर्जीनेच मुलासोबत आलेली आहे माझ्या अपहरणाच्या बातम्या चुकीच्या आहेत," असं म्हटलं.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती

अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपासात मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड महिन्यात दोघांमध्ये ११ वेळा संपर्क झाला होता. यामध्ये मुलीने ८ वेळा एसएमएस केले होते, तर मुलाने मध्यरात्री कॉल केले होते. हे कॉल्स अवघ्या काही सेकंदांचे असून त्यानंतर व्हॉट्सॲपवर त्यांचे संभाषण सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांचा संशय

दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुणीच्या व्हिडिओवर शंका उपस्थित केली आहे. हा व्हिडिओ तरुणीकडून जबरदस्तीने बनवून घेण्यात आला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

"मुलीचा जबरदस्तीने व्हिडीओ तयार करुन तो पोलीस अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात आहे. मी मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचे पुढच्या दोन चार दिवसात लग्न होतं. जबरदस्तीने मुलीचे अपहरण केले गेले. मी भिगवन पोलीस ठाण्यात जाणार आहे. सर्व हिंदू समाज संतापलेला आहे. मी व्हिडीओ पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी सांगितले की हा व्हिडीओ पाठवण्यासाठी वेगळे अॅप वापरले ज्यात लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना घरच्यांना व्हिडीओ पाठवला. म्हणजे या मुलाला वाचवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे. त्याचे चुलते इथले गुंड आहेत. हिंदू मुलीच्या अपहरणामध्येही तो आरोपी होता," असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhigwan Kidnapping: Padalkar alleges video is fake, app used to hide location.

Web Summary : A Bhigwan woman's alleged kidnapping takes a twist. While she claims elopement, BJP MLA Padalkar suspects coercion, citing a suspicious video and location-hiding app use. He alleges a cover-up.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBhigwanभिगवणPoliceपोलिसGopichand Padalkarगोपीचंद पडळकर