शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू; मार्निंग वाॅकला जाताना वाहनाने चिरडले, बारामती-इंदापूर महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:04 IST

दोघींच्या मृत्यूमुळे आनंदनगर -जंक्शन परिसरावर शोककळा पसरली

लासुर्णे : जंक्शन (ता.इंदापूर) येथे पोलिस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर मार्निंगवॉक साठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनांनी धडक देवून चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) यांचा मृत्यू झाला.

जंक्शन,आनंदनगरमधील मधील अनेक नागरिक सकाळी मार्निंग वाॅक साठी बारामती-इंदापूर व जंक्शन - वालचंदनगर रस्त्याने फिरत असतात. तसेच अनेक जण नीरा डाव्या कालव्याच्या ४६ क्रमांकाच्या वितरिकेने ही जात असतात. सध्या बारामती ते इंदापूर दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. जंक्शन चौकामध्ये ही काम सुरु असून काम करणारी अवजड वाहनेही भरधाव वेगाने रस्त्याने ये -जा करीत आहेत. आज बुधवार (ता.२२) रोजी सकाळी सात च्या सुमारास अर्चना सनमठ व अनिता  शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) पोलिस ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अजवड वाहनाने पाठीमागून ठोस दिल्याने अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता शिंदे जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरु असतान मृत्यू झाला. अपघातानंतर वालचंदगर पोलिसांनी ताताडीने अवजड वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

दोघी मैत्रींनीचा दुर्देवी अंत...

अर्चना सनमठ  व अनिता शिंदे या दोघी मैत्रीण होत्या. दररोज नियमित माॅर्निंग वॉक साठी फिरायला जात होत्या. त्यांच्याबरोबर त्यांची दररोज एक मैत्रीण असायची. मात्र आज ती गेली नव्हती. दोघींच्या मृत्यूमुळे आनंदनगर -जंक्शन परिसरावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूWomenमहिलाPoliceपोलिस