शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या साचलेल्या पाण्यात पडून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:44 IST

गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पावसाने लोहगाव-वाघोली रस्ता येथील कर्मभुमी येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप

चंदननगर : पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पावसाने लोहगाव-वाघोली रस्ता येथील कर्मभुमी येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. या साचलेल्या पाण्याने तरूणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सयाजी वाघमारे (वय 25, रा. सुभाष काळभोर यांचे भाडेकरी, दत्त मंदिरासमोर, लोहगाव) असे या तरुणाचे नाव आहे. 

गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सयाजी वाघमारे हे दुचाकी वरून घरी जातं असताना कर्मभूमी येथील रस्त्यावर पावसाने साचलेल्या पाण्यात पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांच्या नाका, तोंडात पाणी गेले. आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषीत केले. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाघमारे हे मूळचे सोलापूर येथील असून ते काळभोर यांच्या घरी भाड्याने राहत होते. ते डम्पर चालवायचे काम करत होते.

साचलेल्या पाण्यातच 15 ऑगस्ट रोजी झेंडा वंदन करणार  

हि घटना गंभीर असून आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. गेल्या आठ दिवसापासून या भागात पाणी साचून आहे. दुचाकी, कार देखील पाण्यात घातल्यानंतर बंद पडत आहेत. नागरिक अक्षरशः पाण्यात पडत आहेत. सणासुदीचे दिवस असताना मुख्य रस्त्यावरून ये-जा करत करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नेहमीच्या या समस्येला सर्व नागरिक वैतागले असून जर महापालिकेने लक्ष दिले नाही. तर साचलेल्या पाण्यातच 15 ऑगस्ट रोजी झेंडा वंदन करण्याचा इशारा लोहगाव - वाघोली नागरिक विकास मंचने दिला आहे.

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसRainपाऊसAccidentअपघातWaterपाणीDeathमृत्यू