शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:47 IST

सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील आणि निलेश चव्हाण याची एकत्र चौकशी करायची आहे

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी सहआरोपी म्हणून समोर आलेल्या निलेश चव्हाण याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांनाही आता तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

निलेश चव्हाण व हगवणे कुटुंबातील सदस्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याचा तपास होणे गरजेचे आहे. आरोपी पळून गेला होता, त्याला मदत कोणी केली, कुठल्या मार्गाने तो पोहोचला, याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्याच्याकडे मुलाचे पालकत्व नसताना बालक का ठेवण्यात आले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले होते. या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील आणि निलेश चव्हाण याची एकत्र चौकशी करायची आहे. या युक्तिवादानंतर कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी दोघांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

शिवाजीनगर कोर्टात हगवणे आरोपींच्या वकिलांनी अजबच युक्तिवाद केला होता. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करू. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. त्या युक्तिवादानंतर पोलिसांनी निलेशकडे असणाऱ्या मोबाईलचा मुद्दा उपस्थित केला. त्या मोबाईलमध्ये आरोपींचे चॅट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. वैष्णवीचा झालेला छळ आता या मोबाईलमधून समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेशकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले आहेत. निलेश चव्हाण, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांची एकत्र चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती.    

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयadvocateवकिल