शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 19:26 IST

भंगार गोळा करत असताना धायरी फाटा येथील कॅनॉलशेजारी असणाऱ्या उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्होल्टेजच्या फिडर बॉक्सला चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

धायरी : वडगाव खुर्द येथील हजार किलो व्हॅटच्या फिडर बॉक्सला चिकटून भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. शफीक बशीर कुरेशी (वय-३९, रा-शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर पुणे) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफीक कुरेशी हे दररोज भंगार गोळा करून उदरनिर्वाह करीत असत. १२ वर्षाचा मुलगा आणि ८ वर्षाची मुलगी व पत्नीसह ते हडपसर परिसरात राहत होते. सोमवारी सकाळी ते हडपसरमधून भंगार गोळा करण्यासाठी वडगाव खुर्द परिसरात आले होते. भंगार गोळा करत असताना धायरी फाटा येथील कॅनॉलशेजारी असणाऱ्या उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्होल्टेजच्या फिडर बॉक्सला चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी माहिती देताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिंहगड रस्ता परिसरात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत....

''वडगाव - धायरी भागात बऱ्याच ठिकाणी फिडर बॉक्स हे उघड्या अवस्थेत आहेत. काही फिडर बॉक्सचे दरवाजे गायब आहेत.  महावितरण विभागाने उघडे असणारे फिडर बॉक्स सुस्थितीत केले पाहिजे. - माधुरी शिवाजी चाकणकर, सामाजिक कार्यकर्त्या'' 

 

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीmahavitaranमहावितरणDeathमृत्यूPoliceपोलिस