शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच...! बिबवेवाडीत तब्बल पंचवीस गाड्यांची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:07 IST

बिबवेवाडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांही आरोपींना वेल्हा तालुक्यातून पाबे घाटातून ताब्यात घेतले

- शिवाजी यादव  बिबवेवाडी : पुणे शहरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही, बि.टी. कवटे रस्ता, दत्तवाडी, लक्ष्मीनगर, पर्वती परिसरात गाड्यांच्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच पुण्यातील बिबवेवाडी परिसरात तिघांनी दहशत माजविण्यासाठी हुल्लडबाजी करत धारदार शस्त्राने पंचवीस वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांही आरोपींना वेल्हा तालुक्यातून पाबे घाटातून ताब्यात घेतले असून बिबवेवाडी परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. अभिषेक पांढरे वय २३ वर्ष गणराज सुनील ठाकर, वय २३ वर्ष असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पांढरे, ठाकर व एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवर ट्रिपल सिट आले होते, त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती. अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री आलेल्या व रस्त्या च्या कडेला लावलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षांची धारदार शस्त्राने व दांडक्याने तोडफोड केली. टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. टोळके तेथून पसार झाले. 

 घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना आरोपी पाबे घाटात असल्याची माहिती मिळाली, माहिती मिळताच सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले. 

कोणतेही  कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी दिली. तर पोलीस उपयुक्त राजीवकुमार शिंदे यांनी अशी दहशत पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू व त्यांना सळो कि पळो करून सोडू. कोणीही कायदा हातात घेतला तर त्याचे कंबरडे मोडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. 

दोन दिवसांपूर्वी बिबवेवाडीत वैमनस्यातून सराइतावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. माधाव वाघाटे खून प्रकरणात बदला घेण्या साठी जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या सराइतावर गोळीबार करण्यात आला होता. पाठोपाठ झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भिंतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था ढासळली जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक