शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी तोडण्याची ‘जलसंपदा’ची भूमिका चुकीची, उलट पुणे महापालिकेचेच त्यांच्याकडे ४११ कोटी - आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 10:38 IST

महापालिकेने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. या पाणीपट्टीच्या थकबाकी बाबत राज्यसरकार जो निर्णय देईल. त्यानुसार पालिका कार्यवाही करेल - आयुक्त

पुणे : पाणी बिलाची ९४८ कोटीची थकबाकी न भरल्यास पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याची जलसंपदा विभागाची भूमिका चुकीची आहे. पालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याचा वापर वाणिज्यसाठी अत्यल्प असून औद्योगिक पाणी वापर नाही. तरीही जलसंपदाकडून औद्योगिक दराने अवाजवी पाणी बिल आकारले जात आहे. हे चुकीचे आहे. पालिकेकडे जलसंपदा विभागाची थकबाकी नाही. याउलट त्यांच्याकडेच महापालिकेचे ४११ कोटी रुपये अतिरिक्त भरले गेले आहेत.

महापालिका आणि जलसंपदा विभागात पाणी उचलण्यावरून आणि बिलाच्या थकबाकीवरून अनेक वर्षांपासून वाद आहेत. महापालिका पाण्याचा औद्योगिक वापर करत नाही, तरीही जलसंपदाकडून औद्योगिक वापराचे बिल लावले जाते, असा आरोप केला जातो. हा वाद गेली अनेक वर्षे सुरूच आहे. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पाणी तोडण्याचा इशारा दिला जातो. त्यावर महापालिका राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करते. राज्य सरकार यावर काहीही तोडगा काढत नसल्याने हे भिजत घोंगडे कायम आहे. गेल्या महिन्यातही जलसंपदाने ९५३ कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस बजावली होती. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार महापालिका दर महिन्याला केवळ दहा कोटींची पाणीपट्टी जमा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, शासनाने शहरासाठी १६.३६ टीएमसी पाणी कोटा निश्चित केला असताना जलसंपदा १४.६१ टीएमसी कोटा मंजूर असल्याचे सांगते. दुसरीकडे नोटीसमध्ये ११.६० टीएमसी कोट्याचा उल्लेख करते. महापालिकेची मागणी २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी आहे. महापालिका क्षेत्रात प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा समावेश नाही, तरीही औद्योगिक वापराचे पाणी बिल लावले जाते. बिलाच्या संदर्भात प्राथमिक वाद निवारण अधिकाऱ्यांकडे अपिल प्रलंबित आहे. असे असताना जलसंपदाने ‘पाणी बंद’ची नोटीस देणे चुकीचे आहे. पालिका वर्षला १७० कोटीची पाणीपट्टी भरते. त्यानुसार दरमहा १४ कोटी रुपये पाणीपट्टी पालिका भरते, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पाटबंधारेकडून पाणी वापरानुसार केली जाणारी दर आकारणी ( प्रति एक हजार लिटर प्रमाणे )

निवासी : ६० पैसे

बिगर निवासी : ३ रुपये २ पैसे

औद्याेगिक वापर : १२.१० रुपये.

महापालिका म्हणते...

१ : पुणे शहरासाठी शासनाकडून मान्य असलेला कोटा हा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे मार्गदर्शक तत्त्वानुसार घेण्यात आला नसून सदर कोटा हा चुकीच्या धारणेने विचारात घेत आहे.२ : पालिका कार्यक्षत्रामध्ये वाणिज्य वापर हा अत्यल्प असून (२५.४८ एम.एल.डी.) (संपूर्ण पाणीवापराच्या १.५४%) त्यामध्ये सरसकट १५% पाण्याचे परिमाण हे वाणिज्य वापरासाठी गृहीत धरणेत येत आहे.३ : शहरामध्ये प्रक्रिया उद्योगाचा पाणीवापर हा शून्य असताना तो सरसकट ५% गृहित धरण्यात येत आहे.

पाणी बंद करण्याची जलसंपदा विभागाची भूमिका चुकीची आहे. पालिकेकडून औद्योगिक दराने पाणी पट्टी आकारणे चुकीचे आहे. याबाबत महापालिकेने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. या पाणीपट्टीच्या थकबाकी बाबत राज्यसरकार जो निर्णय देईल. त्यानुसार पालिका कार्यवाही करेल. -नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation Disputes Water Bill, Claims Overpayment to Irrigation Dept.

Web Summary : Pune Municipal Corporation opposes water cut threats, citing overpayment of ₹411 crore to the Irrigation Department. They dispute industrial billing rates, claiming minimal commercial water usage and no industrial processing within city limits. A resolution is pending with the state government.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तWaterपाणीRainपाऊसSocialसामाजिकDamधरणMONEYपैसा