शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लाखो रुपये केले लंपास; इंदापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 11:02 IST

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात सहा अज्ञात दरोडेखोरांनी एका कुटुंबाला हत्यारांचा धाक दाखवून ३ लाख ३३ हजारांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात सहा अज्ञात दरोडेखोरांनी एका कुटुंबाला हत्यारांचा धाक दाखवून ३ लाख ३३ हजारांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चाकू लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर आदीचा धाक दाखवत चोरी केली आहे. कालींदा अशोक कुबडे वय ३९ वर्षे रा.लाखेवाडी ता. इंदापूर जि. पुणे यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीस ठाण्यात सहा अज्ञात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अंदाजे २२ ते  २५ वयाचे सहा दरोडेखोर  हातामध्ये चाकू, लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर, वाकड़ा कोयता अशा धारदार शस्त्रासह हातात बॅटरी घेऊन फिर्यादी यांचे सासरे ज्ञानदेव सिमाराम कुबडे झोपलेल्या खोलीची आतील कडी काढून त्यांनी खोलीमध्ये घुसले.

दुर्दैवी! प्रसाद बनवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, ३० जण गंभीर जखमी

ज्ञानदेव कुबडे यांच्या गळ्याभोवती लोखंडी जंब्या व डोक्यावर चाकू  धरून धाक दाखवुन खोलीमध्ये ३ ट्रॅन्कमध्ये ठेवलेले ६० हजार रुपये रोख रक्कम, १ लाख लाख रूपये किमितीचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन,५० हजार रुपये किमतीचे सव्वा एक तोळा वजनाचे सोन्याचा मिनी गंठन, २२ हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, १६ हजार रूपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,२२ हजार रूपये किमतीची कानातील दोन फुले,आठ हजार रूपये  सोन्याच्या दोन रिंगा ,५० हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे मणी व डोरलं,चार हजार रुपये किमतीची नथ,दोन हजार रुपये किमतीचे पैजन व एक हजार रूपये किमतीचे पायातील चांदीचे दागीणे असा रोख रक्कमेसह ३ लाख ३३ हजार रुपये ऐवज चोरी केला.

त्यानंतर कालींदा कुबडे यांच्या बाजूला झोपलेल्या खोलीचा दरवाजास जोरात धक्का देऊन तो दरवाजा उघडला.  अज्ञात सहा दरोडेखोरांना त्याच्या हातातील हत्यारांसह पाहिले असता त्यांनी आरडाओरडा केला. त्याच वेळी त्यातील दोघांनी त्यांच्या तोंडावर जोरात बुक्या मारून त्यांना जखमी केले.यासोबत घरातील इतर लोकांना हातातील हत्यारे उगारून हात्यारांचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली.तर फिर्यादी यांचा मुलगा याचे डावे पायावर लोखडी सळईने मारून दुखापत केली.याच वेळी पती अशोक कुबडे हे कोयता घेवुन आल्याचे पाहून या दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला.

सदर गुन्हाचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीPuneपुणेPoliceपोलिस