'कॅप मॅनिया'चा विक्रमी प्रवास आता पुण्यात; ३१ जानेवारीला हिमेश रेशमिया यांच्या सुरांची जादू रंगणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:56 IST2026-01-09T10:53:09+5:302026-01-09T10:56:48+5:30
बहुचर्चित ‘कॅप मॅनिया टूर – हिमेश रेशमिया लाइव्ह’ आता ३१ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात धडकणार आहे.

'कॅप मॅनिया'चा विक्रमी प्रवास आता पुण्यात; ३१ जानेवारीला हिमेश रेशमिया यांच्या सुरांची जादू रंगणार!
विविध शहरांमध्ये आणि देशांमध्ये यशाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर, बहुचर्चित ‘कॅप मॅनिया टूर – हिमेश रेशमिया लाइव्ह’ आता ३१ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात धडकणार आहे. भारतातील अलिकडच्या काळातील सर्वात यशस्वी लाइव्ह कॉन्सर्ट टूर्सपैकी एक असलेल्या या उपक्रमाचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
‘कॅप मॅनिया’चा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. मुंबईतील 'हाऊसफुल्ल' शोने या टूरची दणक्यात सुरुवात झाली. त्यानंतर दिल्लीतील पहिल्या शोची तिकिटे अवघ्या काही दिवसांत विकली गेल्यामुळे आयोजकांना तिथे दुसरा शो आयोजित करावा लागला, त्यालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. अहमदाबादमधील तुडुंब गर्दी आणि दुबईतील यशस्वी शोमुळे या टूरची व्याप्ती आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे.
आता ही टूर पुण्यात येत असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुण्यातील हा कार्यक्रम अधिक भव्य आणि अविस्मरणीय असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील या कॉन्सर्टचे आयोजन आणि प्रमोशन नेस्को इव्हेंट्स करत आहे. नेस्को इव्हेंट्ससाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मुंबईबाहेर लाइव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रात पाऊल टाकण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. या माध्यमातून नेस्को इव्हेंट्स आता संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला विस्तार करण्याची तयारी करत आहे.
नेस्को इव्हेंट्सने यापूर्वी 'रंगिलो रे', लकी अली आणि अनुव जैन यांचे 'वन नाईट', अमित त्रिवेदी लाइव्ह, आणि रसेल पीटर्स यांसारख्या मोठ्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.
पुण्यातील या कार्यक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी नेस्को इव्हेंट्स आणि लोकमत एकत्र आले आहेत. या शोसाठी 'लोकमत' अधिकृत मीडिया पार्टनर म्हणून काम पाहणार आहे. या दोन मोठ्या ब्रँड्समधील ही एका मोठ्या सहकार्याची सुरुवात असून भविष्यातही अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
हिमेश रेशमिया: एक सांस्कृतिक अविष्कार
'कॅप मॅनिया'च्या यशाचे खरे गमक हिमेश रेशमिया यांच्या अफाट लोकप्रियतेमध्ये आहे. ब्लूमबर्गच्या 'ग्लोबल पॉप पॉवर लिस्ट'मध्ये स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय कलाकार आहेत. त्यांच्या गेल्या दोन शोमध्ये ३०,००० हून अधिक चाहत्यांनी हजेरी लावली होती. जुन्या आठवणी, आजची पॉप संस्कृती आणि स्टेजवरील जबरदस्त ऊर्जा यामुळे ही कॉन्सर्ट नसून एक सांस्कृतिक उत्सव ठरत आहे.
पुणे आता या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. या कार्यक्रमाची तिकिटे BookMyShow आणि LiveFiesta वर उपलब्ध आहेत.